“असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.” असा इशाराही दिला आहे
विशेष प्रतिनिधी
निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाजूने निकाल दिल्यानंतर ठाकरे गट अधिकच आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांकडून भाजपा व शिंदे गटावर जोरदार टीका, टिप्पणी सुरू आहे. विशेषता खासदार संजय राऊत यांच्या विधानांमुळे राजकीय वातावरण अधिकच तापताना दिसत आहे. दरम्यान आज (बुधवार) प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी विधिमंडळाबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपा व शिवसेना(शिंदे गट) त्यांच्या विरोधात आक्रमक झाले असून हक्कभंगाच्या कारवाईची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसींनी टीकाही केली आहे. Devendra Fadnavis criticizes Sanjay Raut’s statement regarding the legislature
आज विधिमंडळात बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीसांनी, “संपूर्ण विधानमंडळाला चोरमंडळ म्हणणे हे कुठल्याही स्थितीत सहन केले जाऊ शकत नाही. असे प्रकार जर आपण सहन करणार असू, तर ते गंभीर ठरेल. उद्धव ठाकरे हे सुद्धा या विधिमंडळाचे सदस्य आहेत, मग संजय राऊत त्यांनाही चोर ठरवणार आहेत का?” असा सवाल विचारला आहे.
याशिवाय, “महाराष्ट्र विधानमंडळाची अतिशय थोर परंपरा आहे. देशातील सर्वोत्कृष्ट विधानमंडळ हे महाराष्ट्राचे आहे. हा विरोधी वा सत्ताधारी पक्षाचा प्रश्न नाही. हे सहन केले तर उद्या हजारो संजय राऊत तयार होतील. सर्वोच्च सभागृहाचा हा घोर अपमान आहे. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, हा स्पष्ट संकेत देणे गरजेचे आहे. ” असंही फडणवीस म्हणाले आहेत.
संपूर्ण विधानमंडळाला चोरमंडळ म्हणणे हे कुठल्याही स्थितीत सहन केले जाऊ शकत नाही. असे प्रकार जर आपण सहन करणार असू, तर ते गंभीर ठरेल.उद्धव ठाकरे हे सुद्धा या विधिमंडळाचे सदस्य आहेत,मग संजय राऊत त्यांनाही चोर ठरवणार आहेत का?(विधानपरिषद।दि.1 मार्च 2023)#SanjayRautAbusesVidhanMandal pic.twitter.com/1XC3bxVDyN — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 1, 2023
संपूर्ण विधानमंडळाला चोरमंडळ म्हणणे हे कुठल्याही स्थितीत सहन केले जाऊ शकत नाही. असे प्रकार जर आपण सहन करणार असू, तर ते गंभीर ठरेल.उद्धव ठाकरे हे सुद्धा या विधिमंडळाचे सदस्य आहेत,मग संजय राऊत त्यांनाही चोर ठरवणार आहेत का?(विधानपरिषद।दि.1 मार्च 2023)#SanjayRautAbusesVidhanMandal pic.twitter.com/1XC3bxVDyN
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 1, 2023
शिवगर्जना यात्रेनिमित्त कोल्हापूरात असलेल्या संजय राऊतांनी पत्रकारपरिषदेत म्हटले की, “आम्हाला ही जी बनावट शिवसेना आहे, चोरांचं मंडळ, हे विधिमंडळ नाही चोरमंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही काय पक्ष सोडणार आहोत का? अशी अनेक पदं आम्हाला पक्षाने, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दिली. ती आम्ही पक्षासाठी ओवाळून टाकतो. आम्ही लफंगे नाही आहोत. पदं गेली पदं परत येतील आमचा पक्ष महत्त्वाचा आहे. ”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App