
संजय राऊत यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे. त्यामुळे ते स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशी टीका विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस यांनी केली.Devendra Fadnavis criticizes Sanjay Raut for trying to draw attention to himself
प्रतिनिधी
जळगाव: संजय राऊत यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे. त्यामुळे ते स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशी टीका विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस यांनी केली.
तौक्ते चक्रीवादळामुळे जळगाव जिल्ह्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस जळगावमध्ये आले होते. नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली होती. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली होती.
त्यावर पलटवार करताना फडणवीस म्हणाले, संजय राऊत यांची अवस्था ना घरका ना घाटका झाली आहे. माझ्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढू नका. पण ते इकडचे आहेत की तिकडचे आहेत तेच कळत नाही.
आता ते संपादकही नाहीत. ज्यांच्याकडे लक्ष जात नाहीत, ते लोक आपल्याकडे लक्ष वेधण्याचं काम करत असतात. राऊतही तेच करत आहेत.राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरी दिलेल्या भेटीबाबत फडणवीस म्हणाले,
रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात मी गेलो होतो. त्यामुळे त्यांनी मला चहाला बोलवलं, म्हणून मी त्यांच्या घरी गेलो. त्यात वावगं असे काही समजू नये.
शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटीबाबत ते म्हणाले, आपण खूप संकुचित होत आहोत. पवार आमचे विरोधक आहेत. पण ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची तीन मोठी ऑपरेशन झाली आहेत.
त्यामुळे त्यांची भेट घेतली. हीच आपली प्रथा परंपरा आहे. मला कोविड झाला होता. तेव्हा पवारांनीही माझी फोनवरून विचारपूस केली होती.
Devendra Fadnavis criticizes Sanjay Raut for trying to draw attention to himself
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ?, मुलांना ‘फ्लू’ची लस देणे महत्वाचे ; तज्ज्ञांचा पालकांना सल्ला
- ५-जी तंत्रज्ञानातून उत्सर्जित होणारी रेडिओ फ्रिक्वेन्सी घातक, अभिनेत्री जुहीचा मोठा विरोध
- मुंबईतील झाडांना आता अमेरिकेतील जागतिक वनस्पतीशास्त्रज्ञ देणार जीवदान!
- सर्वोच्च न्यायालयापासून पंतप्रधान मोदीनींही केलं मुंबई मॉडलचे कौतुक, आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला