नाशिक : महाराष्ट्रातल्या नगरपरिषदा, नगरपंचायत यांच्या निवडणुकीत महायुतीने जोरदार बाजी मारत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिली. पण ती साधी धोबीपछाड नव्हे, तर आकड्यांच्या हिशेबात महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचा सुपडा साफ केला.Devendra fadnavis BJP number 1; Sharad Pawar NCP last
नगरपरिषदांच्या निवडणुकीत भाजपने पहिला क्रमांक पटकावला. त्यांचे कमळ चिन्हावर 129 नगराध्यक्ष निवडून आले. त्याचबरोबर कमळ चिन्हावर 3325 नगरसेवक निवडून आले. त्यांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 54 नगराध्यक्ष निवडून आले, तर अजित पवारांचे राष्ट्रवादीचे 39 नगराध्यक्ष निवडून आले. काँग्रेसचे 34 नगराध्यक्ष निवडून आले. उद्धव ठाकरेंचे 9 नगराध्यक्ष निवडून आले, तर शरद पवारांचे फक्त आठ नगराध्यक्ष निवडून आले.
– सोशल मीडियावर सामसूम
संपूर्ण महाराष्ट्र तळहातावरच्या रेषांप्रमाणे ओळखणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा या निवडणुकीत खालून पहिला नंबर आला. देवाभाऊंच्या भाजपचा वरून पहिला नंबर, तर पवारांच्या राष्ट्रवादीचा खालून पहिला नंबर हे या निवडणुकीतले रेकॉर्ड ठरले. पण त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या सोशल मीडियावर फुल टू सामसूम दिसून आली.
एरवी महाराष्ट्रात खुट्ट वाजले तरी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार सोशल मीडिया अकाउंट वरून सरकारला उपदेशाचे डोस पाजत असतात किंवा काही सूचना करत असतात किंवा टीकास्त्र सोडतात. पण कार्यकर्त्यांच्या म्हणून गणल्या गेलेल्या महाराष्ट्रातल्या नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या त्याचे निकाल लागले त्याबद्दल सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी अद्याप पर्यंत एक शब्दही आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर लिहिला नाही. निवडून आलेल्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले नाही मतदारांचे आभार मानले नाहीत की पराभूत झालेल्या कार्यकर्त्यांचे सांत्वन केले नाही.
– सुप्रिया सुळेंची आधीची मखलाशी
आमची निवडणूक असली की कार्यकर्ते राबतात. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत म्हणून आम्हाला त्या स्वतंत्रपणे लढवाव्या लागतात, असे सुप्रिया सुळे निवडणुकीच्या आधी म्हणाले होत्या पण त्या काही कार्यकर्त्याच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी कुठेही फिरल्या नाहीत. त्यांनी कुठल्याही गावात जाऊन कुठल्याही कार्यकर्त्यासाठी प्रचारसभा घेतली नाही, की प्रचार फेरी केली नाही. शरद पवारांनी या वयात छोट्या निवडणुकीच्या प्रचारात उतरणे अपेक्षितच नव्हते, पण सुप्रिया सुळे सुद्धा कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या प्रचारात दिसल्या नाहीत. रोहित पवार जामखेड सोडून इतरत्र कुठे गेल्याचे दिसले नाही.
या सगळ्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नुसता पराभव झाला नाही, तर लोकनेते म्हणून ओळखले जाणाऱ्या पवारांच्या पक्षाचा सगळ्या महाराष्ट्रातून खालून पहिला नंबर आला. 288 नगराध्यक्षांपैकी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे फक्त आठ नगराध्यक्ष निवडून आले. स्वतः शरद पवारांनी त्याविषयी सोशल मीडिया अकाउंट वर काहीही लिहिले नाही, सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनी सुद्धा बाकी बरेच विषय सोशल मीडिया अकाउंट वर लिहिले, पण नगरपालिका नगरपरिषदांच्या निवडणुकीविषयी चकार शब्द लिहिला नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App