Devendra Fadnavis : ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Devendra Fadnavis  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ओबीसी समाजासाठी आपल्या सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचला. मराठा आरक्षणावरून ओबीसी समाजात असलेली अस्वस्थता लक्षात घेऊन त्यांनी यावेळी महत्त्वपूर्ण विधान केले. फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ओबीसी वसतिगृहांची केवळ घोषणा झाली होती, मात्र आम्ही सत्तेत आल्यानंतर 60 नवीन ओबीसी वसतिगृहे सुरू केली. तसेच, 10 लाख ओबीसींना हक्काची घरे दिली आणि समाजासाठी असलेली आर्थिक महामंडळेही मजबूत केली.Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, आपण महाराष्ट्रात कधीही जाती-पातीमध्ये भेदभाव केला नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील 18 पगड जातींना सोबत घेतले होते. त्यामुळे कोणत्याही समाजावर अन्याय करण्याची सरकारची भूमिका नाही. यावेळी त्यांनी ओबीसी समाजाला आश्वस्त केले की, मराठा समाजाला न्याय देत असताना, ओबीसी समाजाच्या आरक्षणावर किंवा हक्कांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही.Devendra Fadnavis



दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात 2 सप्टेंबर 2025 रोजी सरकारने काढलेल्या जीआरमुळे सध्या ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील या जीआरमुळे ओबीसी समाजात आपल्या आरक्षणाला धक्का बसण्याची भीती निर्माण झाली असून, हा जीआर रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन ओबीसी समाजासाठी महत्त्वाचे मानले जात आहे.

ओबीसींचे खरे कैवारी हे देवेंद्र फडणवीस- चंद्रशेखर बावनकुळे

याच मुद्द्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, हा आदेश फक्त मराठवाड्यातील चार जिल्ह्यापुरता मर्यादित आहे, असे असताना काँग्रेस नेते यावर राजकारण करत असून विदर्भातील ओबीसी समाजाचे आरक्षण गेले म्हणून म्हणून मोर्चा काढत होते. मात्र, देवेंद्र फडणवीस असेपर्यंत ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार आहे. बबनराव तायवाडे पण ते सांगत फिरत आहेत. मात्र काँग्रेस नेते ऐकायला तयार नाहीत. ओबीसींचे खरे कैवारी हे देवेंद्र फडणवीस असल्याचे बावनकुळे म्हणाले.

CM Devendra Fadnavis Assures OBC Community in Nagpur: 60 New Hostels Started, 10 Lakh Homes Given; No Compromise on OBC Reservation While Granting Justice to Marathas

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात