विशेष प्रतिनिधी
पुणे : Devendra Fadnavis पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी शासकीय जयंती सोहळा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले, मराठा आरक्षण देताना आम्ही ओबीसींना कोणताही धक्का लावला नाही, मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र न देता ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्यांनाच फक्त आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच ओबीसी समाजाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून त्यांनी मागत राहावे, आम्ही शक्य तेवढे देत राहू, असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.Devendra Fadnavis
इंग्रजांनी जे केले ते आम्ही करणार नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहणार नाही, ओबीसींच्या ताटातील काढून घेऊन सरसकट प्रमाणपत्र देणार नाही. काहीही झाले तर ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाही. ओबीसींकरता योजना करणारे हे सरकार आहे. आमचे सरकारची नीती पक्की आहे. एकाचे काढून दुसऱ्याला द्यायचे नाही. इंग्रजांनी जे केले ते आम्ही करणार नाही. मराठा आरक्षण देताना ओबीसींना धक्का लागणार नाही. मराठवाड्यात 1948 पर्यंत इंग्रज राज्य नव्हते, तर निजाम राज्य होते. मराठवाड्याचे रेकॉर्ड हैदराबाद गॅझेटमध्ये होते. आता ज्यांच्याकडे नोंद असेल त्याला प्रमाणपत्र दिले जाईल.Devendra Fadnavis
तुम्ही मागत राहा, आम्हाला शक्य आहे तेवढे देत जातो
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ओबीसींना जोपर्यंत मुख्य प्रवाहात आणणार नाही त्यावर त्याचा विकास होणार नाही. ओबीसी विकास होईपर्यंत शिवकार्य पूर्ण होऊ शकत नाही. कोणीही मनात शंका घेऊ नका. समाजाने मागण्या केल्या तर आम्ही मागण्या पूर्ण करू. तुम्ही मागत राहा, आम्हाला शक्य आहे तेवढे देत जातो, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे.
क्रांतिकारी उमाजी नाईक यांच्याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, उमाजी नाईक यांना मानाचा मुजरा करतो. दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या रामोशी समाजाचा संबंध हा प्रत्यक्ष श्रीराम याच्याशी आहे. रामोशी समाजाच्या राजाचे कार्य अतुलनीय आहे. शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यामध्ये बहिर्जी नाईक रामोशी हे महाराजांचे विश्वासू होते, गुप्तहेर होते. बहिर्जी नाईक हे तिसरा डोळा म्हणून काम करत होते.
उमाजी नाईक शिवाजी महाराज झाले असते
देव देश धर्माच्या लढ्यात हा रामोशी समाज अग्रेसर होता. ब्रिटिशांना पहिला विरोध राजे उमाजी नाईक यांनी केला. त्यांनी सेना तयार करून इंग्रजांना पळवले. रॉबर्ट यांनी पत्र लिहिले का उमाजी नाईक शिवाजी महाराज झाले असते. उमाजी नाईक हे उत्तम प्रशासक होते, स्वतःच्या हाताने त्यांनी पत्र लिहिले आहेत.
इतिहासाने या समाजाचा इतिहास कधीच पुढे येऊ दिला नाही
उमाजी नाईक सापडले नसते पण फितुरी झाली. शुभराजे पण असेच पकडले गेले. राजे उमाजी नाईक यांना पकडून इंग्रजांनी फाशी दिली. पण समाजाची लढाई थांबली नाही. इंग्रजांनी गुन्हेगारी कायदा करून समाजाला गुन्हेगार ठरवले. यांना नाही दाबले तर राज्य करता येणार नाही हे माहिती होते. पण इतिहासाने या समाजाचा इतिहास कधीच पुढे येऊ दिला नाही. जवळपास 80 वर्षे गुन्हेगारी म्हणून समाज मागे गेला, त्यांचा विकास नाही झाला. आता सरकारचा प्रयत्न आहे की त्यांना त्यांचा विकास शौर्य आठवण करून द्यायचा आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणायचे.
महाज्योतीमधून स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देण्यात येणार
हा कार्यकम जयंती पुरता नाही, तुम्ही कोण आहे लक्षात आले पाहिजे. आता मागे राहता कामा नये. आता पुढे गेले पाहिजे. समाज पाठीमागे राहणार नाही यासाठी राजे उमाजी नाईक महामंडळ स्थापन केले. त्यामाध्यमातून 15 लाखांपर्यंत कर्ज द्या, दोन लाखांपर्यंत बिगर तारण कर्ज देण्यात येईल. हा समाज नोकरी देणारा झाला पाहिजे. महाज्योतीमधून स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App