केलेल्या कामाच्या फडणवीसांच्या जाहिराती; पोस्टर वरच्या मुख्यमंत्र्यांना पोटदुखी!!

Devendra fadnavis

नाशिक : केलेल्या कामाच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिराती झाल्या. त्यामुळे पोस्टर वरच्या मुख्यमंत्र्यांना पोटदुखी झाल्याचे समोर आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण केली मनोज जरांगे यांचे आंदोलन संपले. ते मुंबईतून आंतरवली सराटीत गेले. त्यामुळे अनेकांचे पापड मोडले. कारण मनोज जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधायचे अनेकांची कारस्थाने उधळली गेली.Devendra fadnavis advertisements punctures Rohit Pawar

पण त्यानंतर केलेल्या कामाच्या देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिराती महाराष्ट्रातल्या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये छापून आल्या. ठाण्यात देवाभाऊची प्रचंड पोस्टर झळकली. त्यातून देवेंद्र फडणवीस यांचे जोरदार ब्रॅण्डिंग करण्यात आले. सगळीकडे फक्त देवाभाऊची हवा आहे. दादा किंवा भाई यांची हवा नाही, अशी वातावरण निर्मिती करण्यात आली. या सगळ्यांमध्ये साहेब आणि त्यांच्या अनुयायांचे राजकारण मात्र मुंबईच्या समुद्रात वाहून गेले. आझाद मैदानातल्या आंदोलनातून त्यांना काही साध्य करता आले नाही. त्यांच्या हाती काहीच लागले नाही.



त्यामुळे पोस्टरवरच्या मुख्यमंत्र्यांना पोटदुखी झाली. पोस्टर वरच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या x हॅण्डल वर भली मोठी पोस्ट लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ब्रँडिंग वर आक्षेप घेतला. फडणवीसांच्या जाहिराती एवढ्या मोठ्या जाहिराती वर्तमानपत्रांना का दिल्या??, त्या निनावी होत्या?? त्यांनी असे कोणते काम केले की त्यामुळे ब्रॅण्डिंग करावेसे वाटले??, वगैरे सवाल पोस्टरवरच्या मुख्यमंत्र्यांनी केले. वर्तमानपत्रांना कोट्यावधी रुपयांच्या जाहिराती कोणी दिल्या??, त्यावर कोणी खर्च केला??, याची माहिती नाही. मला समजलेली माहिती अशी की या जाहिराती भाजपच्या मित्र पक्षाच्या एका मंत्र्यांनी दिल्या. हे मंत्री कोण त्यांनी कशाच्या आधारे जाहिराती दिल्या याची माहिती लवकरच महाराष्ट्राला समजेल, असा दावा पोस्टरवरच्या मुख्यमंत्र्यांनी केला.

पोस्टर वरच्या मुख्यमंत्र्यांची पोस्टर लावताना आणि जाहिराती देताना सगळ्यांची नावे मोठी त्यावर असतात पोस्टरवरच्या मुख्यमंत्र्यांचे भले मोठे फोटो त्यावर झळकतात. ते महाराष्ट्रातल्या रस्त्या रस्त्यांवर ओसंडून वाहतात. पण पोस्टर वरचे मुख्यमंत्री पोस्टर वरून उतरून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर जाऊन कधी बसू शकले नाहीत. कारण त्यांची तेवढी क्षमता असल्याचे सिद्ध झालेले नाही. त्यामुळे सध्या ते निनावी जाहिरातींबद्दल भाजपवरच “लेखन सुख” घेताना आढळत आहेत.

Devendra fadnavis advertisements punctures Rohit Pawar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात