विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ येथे ‘AI फॉर ॲग्रीकल्चर: स्केलिंग इंटेलिजेंस फॉर फूड अँड क्लायमेट रेझिलियन्स’ या विषयावर संवाद साधला. महाराष्ट्राचे महाराष्ट्र विस्तार मॉडेल आता भारत विस्तार नावाने संपूर्ण देशाने स्वीकारले याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी अभिमान आणि समाधान व्यक्त केले.
यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री नितेश राणे, एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनच्या (MSSRF) अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामीनाथन, जागतिक बँकेच्या दक्षिण आशिया विभागाचे उपाध्यक्ष जोहॅन्स झुट, एकस्टेप फाउंडेशनचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर मरुवाडा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
– सामंज्यस करार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नवी दिल्ली येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये माहिती व तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन, भारतजेन टेक्नॉलॉजी फाउंडेशन आणि आयआयटी मुंबई यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या कराराद्वारे आर्टिफिशल इंटेलिजन्स (AI) आणि प्रशासकीय यंत्रणांचे डिजिटायजेशन या क्षेत्रात संस्थात्मक सहकार्याची स्पष्ट रूपरेषा ठरविण्यात आली आहे. या भागीदारीत माहितीची देवाणघेवाण, उपयोजित संशोधन, प्रायोगिक प्रकल्प आणि उदयोन्मुख AI क्षेत्रांमध्ये क्षमता बांधणी यावर भर दिला जाणार आहे.
यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव, आयआयटी मुंबई चे उपसंचालक प्रा. मिलिंद अत्रे, भारतजेनचे प्रतिनिधी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App