विशेष प्रतिनिधी
नागपूर :Devendra Fadnavis अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर शरद पवारांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्यावर जोरदार टीका केली. या घटनेची फक्त चौकशीच नको, तर जबाबदारी स्वीकारून पदावरून दूर व्हा, अशा शब्दांत पवारांनी महायुतीच्या नेत्यांना फटकारले. त्यावर आता फडणवीसांची प्रतिक्रिया व्यक्त केली.Devendra Fadnavis
शरद पवारांना केवळ सत्ताच पाहिजे आहे. इतकी गंभीर घटना झाल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे, असा टोला फडणवीसांनी लगावला.
बाबा सिद्दीकींची काल मुंबईतील वांद्रे या ठिकाणी हत्या झाली. ते वांद्रे येथील खेरवाडी सिग्नलजवळील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयात चालले होते, त्यावेळी तीन अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारानंतर सिद्दीकी यांच्यावर हल्ला करणाऱ्या तिघांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली.
याबाबत आज माध्यमांशी बोलतांना फडणवीस म्हणाले, बाबा सिद्दीकी आणि माझी चांगली मैत्री होती. त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक आहे. बाबा सिद्दिकींशी माझी जवळची मैत्री होती. अनेक वर्ष आम्ही सोबत काम केलेलं आहे. त्यामुळं त्यांच्या हत्येच्या घटनेममुळे आम्हा सगळ्यांनाच धक्का बसला.
पुढं बोलतांना ते म्हणाले, याप्रकरणातले दोन आरोपींना पकडण्यात आलं आहे. अजून तपास सुरू आहे. काही धागेदोरे पोलिसांना मिळालेत. त्यातील काही अॅंगल्सही आम्ही तपासत आहोत. यासंदर्भात पोलीस माध्यमांना योग्य ती माहिती देतील, असे फडणवीस म्हणाले होते.
सिद्दीकींच्या हत्येनंतर पवारांनी फडणवीसांचा राजीनामा मागितला. त्यावरही फडणवीसांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, मला असं वाटतं की, पवारांना केवळ सत्ताच पाहिजे आहे. इतकी गंभीर घटना झाल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे, पण आमच्या नजरेसमोर महाराष्ट्र आहे. आम्हाला महाराष्ट्राकडे पाहायचं आहे, महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. प्रगती साधायची आहे आणि महाराष्ट्र सुरक्षित ठेवायचाय. त्यामुळे त्यांना जर खुर्चीकडे पाहायचं असेल आणि बोलायचं असेल तर त्यांनी ते बोलावं, असं फडणवीस म्हणाले.
बाबा सिद्दीकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो, असंही फडणवीस म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App