Devendra Fadanvis नाशिकच्या कुंभमेळा आढावा बैठकीपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस पोहोचले त्रंबकेश्वराच्या दर्शनाला!!

विशेष प्रतिनिधी

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis काल रात्रीच आपल्या नियोजित नाशिक दौऱ्यावर दाखल झाले. नाशिकचा कुंभमेळा आढावा बैठक घेण्यापूर्वी ते सकाळी त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला पोहोचले. तिथे त्यांनी मंदिरात जाऊन त्र्यंबक राजाची पूजाअर्चा आणि आरती केली. यावेळी त्यांनी भगवे सोवळे आणि भगवी शाल परिधान केली होती.

नाशिक मध्ये पुढच्या दोन वर्षांनी म्हणजे २०२७ मध्ये कुंभमेळा होणार आहे. १७ जुलै २०२७ रोजी गोदावरीतल्या पवित्र स्नानाने कुंभमेळ्याची सुरुवात होईल. या कुंभमेळ्याच्या तयारीची सुरुवात फडणवीस सरकारने आत्तापासून सुरू केली आहे. प्रयागराज मध्ये झालेल्या कुंभमेळ्यात तब्बल 67 कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नान केले. तो कुंभमेळा साधारण दीड महिना चालला. या दीड महिन्याच्या कालावधीत 67 कोटी भाविकांनी प्रयागराजला भेट दिली होती. त्या कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने केले होते. Devendra Fadanvis

तशाच पद्धतीने नाशिकच्या कुंभमेळ्याचे आयोजन करण्याचा फडणवीस सरकारचा मानस आहे. त्यासाठी वेगवेगळे विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस नाशिकला आले आहेत. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक मध्ये येऊन कुंभमेळ्याशी संबंधित विकासकामांचा आढावा घेतला होता त्या पुढच्या टप्प्यात स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष घालत नाशिक मधल्या विकास कामांना गती देण्याचा इरादा व्यक्त केला आहे.

Devendra Fadanvis is in Trimbakeshwar Temple Nashik

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात