प्रतिनिधी
नागपूर : अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा जाहीर झाल्यानंतर अनेक नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पण महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्याविषयी अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती, ती नागपूरच्या विमानतळावर व्यक्त केली आहे.Devendra Fadanavis pinched ajit Pawar over his chief ministership ambitions
अजितदादांची मुलाखत आपण बघितली नाही. पण अनेकांना मुख्यमंत्री व्हावेसे वाटते. त्यात काही गैर नाही. वाटू शकते. पण अनेकांना आवडतं म्हणून मुख्यमंत्री होता येतचं असं नाही. त्यांना तुमच्या शुभेच्छा आहेत, असा टोला फडणवीस यांनी अजितदादांना लगावला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार असे अनेक दिवस बोलले जात होते. पण आपण शांत होतात असे फडणवीसंना विचारताच ते म्हणाले, की त्या राजकीय भूकंपाच्या बातम्यांमधून अनेकांचे मनोरंजन होत होते. तसेच माझेही मनोरंजन झाले. त्याचा आनंद मी घेत होतो. महाविकास आघाडीत आतमध्ये काय चाललेय, ते मला माहिती नाही पण ते जे काही वज्रमूठ वगैरे म्हणतायत तशी त्यांची वज्रमूठ वगैरे काही नाही. त्याला आधीपासूनच अनेक भेगा आहेत, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
https://fb.watch/k3CE2mH0XG/?mibextid=6aamW6
अजितदादांच्या मुख्यमंत्री पदावर अनेकांनी भाष्य केले आहे. त्यापैकी आत्तापर्यंत झालेल्या भाष्यांमध्ये फडणवीस यांचे भाष्य सगळ्यात महत्त्वाचे आहे. महत्त्वाकांक्षा असली तरी ती पूर्ण होतेच असे नाही, असे त्यांनी उघडपणे सांगून अजितदादांना मुख्यमंत्री पद मिळणे किती अवघड आहे, हेच सूचक पद्धतीने नमूद केले!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App