पवारांशी चर्चेनंतरच शपथविधी, मी जे बोललो ते सत्यच, उरलेले अर्धे योग्य वेळी सांगेन; फडणवीसांचा पुण्यातून पलटवार

प्रतिनिधी

पुणे : भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सरकारचा शपथविधी शरद पवारांची चर्चेनंतरच झाला होता, असे वक्तव्य पहाटे शपथ घेणारे मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीत केले होते. मात्र त्या संदर्भात शरद पवारांनी फडणवीस यांच्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मात्र फडणवीस आजही आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले. Devendra Fadanavis again targets sharad Pawar over BJP – NCP government formation in maharashtra

पुण्यात कसबा मतदार संघातील पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीस आले. त्यांनी प्रचारादरम्यान खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, की माझ्याबरोबर अजितदादांनी देखील शपथ घेतली होती. हा शपथविधी शरद पवार यांच्या संमतीने झाला होता. हे वक्तव्य मीमुलाखतीत केले. ते सत्यच बोललो. उरलेले अर्धे मी योग्य वेळ आल्यानंतर सांगेन. मी मुलाखतीत जे सांगितले त्याचे वेगवेगळे अर्थ तुम्ही पत्रकारांनी काढलेत. पण माझ्या त्या वेळच्या पत्रकार परिषदा व्यवस्थित बघा. मी जे बोललो त्याच्या तुम्हाला कड्या व्यवस्थित जोडता येतील. मग तुम्हाला दुसऱ्या पुराव्याची गरजही पडणार नाही, असे ठाम वक्तव्य फडणवीस यांनी आज केले आहे.


Fadanavis Pendrive Bomb : पोलीस अधिकारी इसाक बागवान – बारामती – दाऊद कनेक्शन; फडणवीसांनी फोडला तिसरा पेन ड्राईव्ह बॉम्ब!!


फडणवीस हे सभ्य सुसंस्कृत राजकारणी आहेत असे वाटले होते. त्यामुळे ते असत्य बोलतील असे वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांच्या मुलाखतीनंतर शरद पवारांनी व्यक्त केली होती. पवारांच्या या प्रतिक्रियेला खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील दुजोरा दिला होता.

पण शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या या प्रतिक्रिया नंतर देखील आज फडणवीस आपल्या मुलाखतीतल्याच वक्तव्यावर ठाम राहिले. एवढेच नव्हे तर उरलेले अर्धे मी योग्य वेळी सांगेन, असे वक्तव्य करून त्यांनी महाराष्ट्रात राजकीय सस्पेन्स वाढवला आहे. त्याचबरोबर शरद पवार यांच्या राजकीय विश्वासार्हतेवर त्यांनी पुन्हा एकदा ठळक प्रश्नचिन्ह लावले आहे.

Devendra Fadanavis again targets sharad Pawar over BJP – NCP government formation in maharashtra

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात