विशेष प्रतिनिधी
नागपूर : Devanand Sonatakke नागपूरमधील एका बारमध्ये बसून सरकारी फायलींवर सह्या करताना आढळलेल्या अधिकाऱ्याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चामोर्शी येथील उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के याच्यावर ही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. Devanand Sonatakke
संबंधित अधिकाऱ्याचा एक व्हिडीओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये हा अधिकारी इतर दोघांसोबत नागपूरमधील कीर्ती बार अॅण्ड रेस्टॉरंटमध्ये मद्यपान करत असताना महाराष्ट्र शासनाच्या फायल्स तपासत असल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती. आता संबंधित व्हिडीओबाबतचे सीसीटीव्ही फुटेजही प्राप्त झाले आहे. या फाईल्स सार्वजनिक बांधकाम विभागाच्या असल्याची खातरजमा झाली असून, त्या फाईल्स त्यांनी चामोर्शी (जि. गडचिरोली) येथून नागपूरमध्ये नेल्या होत्या. Devanand Sonatakke
या घटनेची गंभीर दखल घेत राज्य सरकारने तातडीने चौकशीचे आदेश दिले होते. महसूल मंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशी सुरू करण्याचे निर्देश दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याच्या हकीकत समोर आली. दरम्यान, याप्रकरणी बारमधील सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, चौकशीदरम्यान, तो अधिकारी चामोर्शी येथे कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शासनाकडून निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले असून, गडचिरोली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांनी अधिकृतपणे ही माहिती दिली. Devanand Sonatakke,
सरकारी कागदपत्रांची अवहेलना
शासकीय कागदपत्र हे अत्यंत गोपनीय आणि संवेदनशील असतात. अशा कागदपत्रांवर सार्वजनिक ठिकाणी तेही मद्यपान करताना सह्या करणे ही गंभीर शिस्तभंगाची बाब मानली जाते. त्यामुळे या प्रकरणात केवळ निलंबन न करता, सखोल चौकशी करून पुढील शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, शासन स्तरावरून याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. पुढील तपशील चौकशीनंतर उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App