Vadettiwar : नाना पटोले यांना मुख्यमंत्र्यांनी धू धू धुतले तरी वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा ते आरोप केले

Vadettiwar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Vadettiwar हनीट्रॅपच्या आरोपांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत काँग्रेस आमदार नाना पटोले यांना धू धू धुतले होते. सभागृहाचा वेळ वाया घालविल्याबद्दल चांगलेच खडसावले होते. आज पुन्हा काँग्रेसचे दुसरे आमदार विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तेच आरोप केले आहेत.Vadettiwar

महाविकास आघाडीचे सरकार उलथावून सत्तेत आलेले एकनाथ शिंदे सरकार हनीट्रॅपमुळे आल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा कुणाला अधिकार नाही म्हणून आम्ही शांत आहोत, असेही ते म्हणाले.Vadettiwar

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी गुरूवारी विधानसभेच्या पटलावर मंत्रालय, नाशिक व ठाणे हे हनीट्रॅपचे केंद्र झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी एक पेन ड्राईव्हही सभागृहात दाखवले होते. विधानसभा अध्यक्षांनी सरकारला हनीट्रॅपच्या मुद्यावर निवेदन करण्याचे सांगितले. पण त्यांच्या सूचनेनंतरही सरकारने त्यावर निवेदन केले नाही. या प्रकरणी महाराष्ट्राची बदनामी होत आहे. मंत्रालय, नाशिक व ठाणे हे हनीट्रॅपचे केंद्र बनले आहे. राज्याचे महत्त्वाचे दस्तऐवज या समाजविघातक संघटनाच्या हाती जात आहेत. मी कुणाचेही चारित्र्यहनन करत नाही. माझ्याकडे पेन ड्राईव्हही आहे, असे पटोले म्हणाले होते. पटोले यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आरोप फेटाळले होते. ना हनी आहे ना ट्रॅप. आमच्यापर्यंत नाना पटोलेंचे बॉम्ब पोहोचलाच नाही, असे ते या आरोपांची खिल्ली उडवत म्हणाले होते.



मात्र आज पुन्हा वडेट्टीवार आरोप करताना म्हणाले, मुख्यमंत्री काल हनीही नाही आणि ट्रॅपही नाही असे म्हणाले. पण त्यासंदर्भात सरकार व विरोधकांकडे फार मोठी माहिती आहे. कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा कुणाला अधिकार नाही म्हणून आम्ही शांत आहोत. पण मागच्या वेळेस शिंदे सरकार जे आले, ते अशाच नाशिकच्या प्रकरणामुळे आले. जे काही सत्तापालट झाले ते सीडीमुळेच झाले, एवढे मोठे ते प्रकरण आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत हनीट्रॅपचे आरोप फेटाळले. पण सरकार व विरोधकांकडे याविषयी मोठी माहिती आहे. त्याचे पुरावे द्यायचे झाले तर आम्हाला तिकीट लावावे लागेल. विशेषतः एकनाथ शिंदे यांचे सरकाही नाशिकच्या सीडीमुळेच आले होते.

हनीट्रॅपमध्ये अनेक ऑफिसर, आयएएस व माजी अधिकारी आहेत. अनेक मोठी माणसे आहेत. त्यावर अधिक काही बोलण्याची गरज नाही. ते ज्यावेळी आम्ही दाखवू. त्यावेळी आम्हाला 10-20 हजारांचे तिकीटच लावावे लागेल. ते चित्र निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच दाखवावे लागेल. एवढा भक्कम पुरावा त्या ठिकाणी आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज पुन्हा या प्रकरणावर एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. मी जे हनी ट्रॅप विषयी विधानसभेत बोललो त्याचा हा घ्या पुरावा. हे हॉटेल कुणाच्या मालकीचे? असा सवाल त्यांनी केला आहे. या बातमीत म्हटले आहे की ‘त्या’ हॉटेलची ठाण्याच्या पथकाकडून चौकशी, ‘हनी ट्रॅप’ प्रकरण : संशयास्पद वस्तू ताब्यात घेतल्याची चर्चा . या प्रकरणातील पंचतारांकित हॉटेल चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. केवळ व्यवसायाच्या नावाखाली नव्हे, तर पोलिस, महसूल आणि प्रशासकीय यंत्रणांना हाताशी धरून सत्तेचा आणि सौद्यांचा काळा बाजार येथे राबवण्यात येत असल्याचे गंभीर आरोप समोर येत आहेत. दरम्यान, याप्रकरणी ठाण्याचे पोलिस पथक कथित हॉटेलची चौकशी करण्यासाठी नाशिक शहर पोलिसांना टाळून आल्याचे समजते. हनी ट्रॅप प्रकरणातील मुख्य संशयित महिला ही नाशिकची रहिवासी असून, सध्या ठाणे येथे स्थायिक आहे. यापूर्वी ती सिडको आणि पाथर्डी फाटा परिसरात राहत होती. हॉटेल मालकाशी घनिष्ट संबंध ठेवत तिने कमी वेळात मोठी आर्थिक प्रगती केल्याची माहिती असून, सध्या ती मुंबईतील एका मोठ्या बिल्डरच्या प्रकल्पात वास्तव्यास आहे. तिच्या नावावर ठाण्यात कपड्याची तीन शोरूम असून, पाथर्डी फाटा, गंगापूर रोड व मुंबई नाका परिसरातील हॉटेलांतील लेट नाईट पार्टी व इव्हेंट्समध्ये कायम दिसून येत होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवले जात असल्याचे तपशील समोर येत आहेत. विशेष बाब म्हणजे तब्बल ७२ वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिले. त्यात त्यांनी नाना पटोले यांनी हनीट्रॅप संदर्भात केलेला आरोप धुडकावून लावला. ते म्हणाले, कालपासून हनीट्रॅपचा विषय सभागृहात येत आहे. यांनी कोणता हनीट्रॅप आणला? हे मला समजतच नाही. नानाभाऊंनी तर कुठला बॉम्बच आणला म्हणे… नानाभाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब… तुमच्याकडे तो असेल तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना… ना हनी आहे ना ट्रॅप आहे. नानाभाऊ एखादी घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे. पण माहोल असा क्रिएट होतो की, आजी-माजी मंत्री. आता सगळे एकमेकांकडे पाहत आहेत. इकडे आजी आहेत, तिकडे माजी आहेत. हे आजी मंत्री आहेत की माजी मंत्री आहेत. कोण फसले आहे या हनीट्रॅपमध्ये?

कुठल्याही आजी-मंत्र्याच्या हनीट्रॅपची तक्रारही नाही. पुरावेही नाहीत. अशी घटनाही समोर आलेली नाही. हनीट्रॅप नाहीच. पण अशी एक तक्रार नाशिकच्या संदर्भात आली होती. एका महिलेने तक्रार केली. त्यानंतर त्यांनी ती तक्रार मागेही घेतली. एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भात अशा प्रकारची तक्रार होती. मला त्याचे राजकारण करायचे नाही. पण आपण सातत्याने व्यक्तीचा, हॉटेलचा, हॉटेल मालकाचा उल्लेख करत आहात. ती व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष आहे. त्याने निवडणूकही लढली आहे. हा पाहा पंजा, असे फडणवीस सभागृहात एक पोस्टर दाखवत म्हणाले.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री सभागृहात पटोले यांच्या आरोपांची पिसे काढत असताना विजय वडेट्टीवार गप्प बसून होते. त्यांच्याकडे पुरावे होते तर शांत का राहिले असा सवालही केला जात आहे.

Despite CM’s Strong Rebuttal to Nana Patole, Vadettiwar and Jitendra Awhad Repeat Allegations

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात