उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- फेक नॅरेटीव्ह या आजच्या रावणाचा अंत करण्यासाठी भाजपा सज्ज! महायुती पुन्हा सत्तेत येईल

विशेष प्रतिनिधी

पुणे : भाजपा महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनामध्ये रविवारी बालेवाडी, पुणे येथे गुरुपौर्णिमेच्या दिवशी भाजपचे अधिवेशन पार पडले. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांचा विशाल जनसागर उपस्थित होता. या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shah ) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी फडणवीसांनीही भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले. Deputy Chief Minister Fadnavis said – BJP is ready to end the fake narrative of today’s Ravana! Mahayuti will come back to power Deputy Chief Minister Fadnavis said – BJP is ready to end the fake narrative of today’s Ravana! Mahayuti will come back to power

फडणवीस म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत, जनता भाजपाच्या पाठीशी उभी होती. परंतु हा लढा फेक नॅरेटीव्ह विरोधात देखील होता. या निवडणुकीत मिळालेल्या पिछाडीमुळे फेक नॅरेटीव्हशी सामना करण्यासाठी भाजपा सज्ज झाला. या निवडणुकीत 43.6% महायुतीला, तर 43.9% महाविकास आघाडीला मिळाले. हा ‘थोडी अधिक मेहनत करण्याची’, गरज अधोरेखित करणारा निकाल आहे.

ते पुढे म्हणाले की, संविधानाने दिलेल्या आरक्षणाची सीमा श्रद्धेय अटलजी आणि नंतर मोदीजी यांनी वाढवल्यामुळे, देशामध्ये आरक्षण सामान्य माणसाला मिळते आहे. तरी देखील आम्ही निवडून आलो की, ‘संविधान बदलणार आणि आरक्षण संपवणार’, असा खोटा नॅरेटीव्ह पसरवून विरोधकांनी मते मिळवली. परंतु विरोधकांचा हा विजय ‘एखाद्या फुग्यासारखा’, कार्यकर्त्याने टाचणी लावली तरी हा फुगा फुटेल. या विधान परिषदेच्या निवडणुकीपासून हा फुगा फुटायला सुरुवात झाली. खोट्याला खर्‍याने उत्तर देण्यासाठी, विचार करावा लागत नाही. यावेळी कार्यकर्त्यांना, ‘फेक नॅरेटीव्हला उत्तर देण्यासाठी, आदेशाची वाट पाहू नका, मैदानात उतरा, फक्त हीट विकेट होऊ नका वा सेल्फ गोल करू नका. आदेश विचारू नका, मैदानात उतरून ठोकून काढा’ असेही संगितले.

उपमुख्यमंत्री फडणवीस (devendra fadnavis ) म्हणाले की, भाजपाचे हिंदुत्व हे व्यापक हिंदुत्व आहे. हिंदुत्व म्हणजेच सहिष्णुता आहे. परंतु हल्ली हिंदूंना दहशतवादी म्हटले जात आहे, विशालगडावरील घटनेत शिवप्रेमींना दहशतवादी म्हटले गेले. तर राहुल गांधींनी हिंदूंना हिंसक म्हटले. आताही आपण जागे झालो नाहीत, तर उद्या जागे होण्याची संधी मिळणार नाही. ‘फेक नॅरेटीव्ह’ हाच आजचा रावण आहे, त्याचा अंत करून महायुती पुन्हा सत्तेत येईल.

ते पुढे म्हणाले की, या अधिवेशनामार्फत आव्हानांना उत्तर देणारा कार्यकर्ता निर्माण करण्याचा हेतु आहे. या पक्षात 90% कार्यकर्ते जाणतात, आम्हाला जीवनात काहीच मिळणार नाही, परंतु ते काम करत राहतात कारण ते व्यक्तीसाठी नाही विचारांसाठी काम करतात. देशाच्या परिवर्तनाच्या मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या लढाईत महाराष्ट्र त्यांच्या सोबत राहावा, म्हणून मागील काळात आम्ही सत्तेत परिवर्तन घडवले, त्यामुळे कुठे तह आणि कुठे सलगी करावी लागली. भाजपा हा निष्ठावंतांच्या भरवशावर उभा आहे. निवडणुकीत कमी जागा मिळाल्याचा फायदा हा आहे, की ‘पक्षासोबत खरा कोण आहे’, हे ओळखता येते. यावेळी ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा महायुतीचाच होणार’, अशी ग्वाही कार्यकर्त्यांना दिली. महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी, महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला कार्यकर्ता तयार आहे, या मानसिकतेने पुढे गेल्यास ही निवडणूक जिंकणे शक्य आहे, हा माझा विश्वास आहे.

यावेळी केंद्रीय मंत्री अमित शहा, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सह संगठन सरचिटणीस शिवप्रकाश, भाजपा महाराष्ट्र प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, सहप्रभारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री मंगलप्रभात लोढा, रावसाहेब दानवे, खा. अशोक चव्हाण, मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, भाजपाच्या राष्ट्रीय मंत्री पंकजाताई मुंडे, मंत्री रविंद्र चव्हाण, भाजपा राष्ट्रीय सचिव विजयाताई राहटकर, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री डॉ. विजयकुमार गावित तसेच भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Deputy Chief Minister Fadnavis said – BJP is ready to end the fake narrative of today’s Ravana! Mahayuti will come back to power

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात