‘’काही नेते जाणीवपूर्वक राजकीय विधानं करून, तिथली परिस्थिती बिघडली पाहिजे असा प्रयत्न करत आहेत.’’ असंही फडणवीस म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : शहरातील किराडपुरा भागात झालेल्या दगडफेकीनंतर निर्माण झालेल्या तणावावर राजकीय आरोप – प्रत्यारोपांचा राडा सुरू आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि भाजपा या सगळ्या षडयंत्रामागे आहे. असा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Deputy Chief Minister Devendra Fadnavis warning on Chhatrapati Sambhajinagar riots
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘’संभाजीगरला घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. आता तिथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु काही लोकांचा प्रयत्न आहे, की त्या ठिकाणी भडकवणारी विधानं करून, परिस्थिती अजून चिघळली पाहिजे हे पाहिलं जात आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की अशा परिस्थितीत नेत्यांनी कसं वागलं पाहिजे? हे देखील समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कोणीच जर अशाप्रकारची चुकीची विधानं करत असतील, तर त्यांनी ती देऊ नयेत. सगळ्यांनी शांतता पाळावी. आपलं शहर शांत ठेवण्याची जबाबदारी ही सगळ्या नेत्यांची आहे. या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर त्यापेक्षा अधिक दुर्दैवी काहीच नाही. मी पुन्हा सांगतो, की अशाप्रकारची विधानं करणं म्हणजे किती राजकीय बुद्धीने आणि किती छोट्या बुद्धीने बोललं जात आहे त्याचं हे परिचायक आहे.’’
संभाजीनगर दंगली वरून राजकीय आरोप – प्रत्यारोपांचा राडा; पण परिस्थिती पूर्ण नियंत्रणात, 3500 पोलीस तैनात!!
https://youtu.be/jARqw1soML8
याशिवाय ‘’आता तिथे शांतता आहे, तरीदेखील हीच शांतता राहिली पाहिजे असा प्रयत्न सगळ्यांनाच करावा लागेल. म्हणून मी म्हटलं काही नेते जाणीवपूर्वक राजकीय विधानं करून, तिथली परिस्थिती बिघडली पाहिजे असा प्रयत्न करत आहेत, स्वत:च्या स्वार्थासाठी हा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे, त्यांनी तत्काळ बंद करावा. माझी सगळ्यांना विनंती आहे, शांतपणे आपला सगळा कार्यक्रम सगळ्यांनी पार पाडावा, कुठेही गडबड गोंधळ होऊ नये, कोणीही एकमेकाच्या समोर येऊ नये. कुठेही शांततेचा भंग होणार नाही. याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावे.’’ असंही फडणवीसांनी सांगितलं आहे.
’संभाजीनगर मधील परिस्थिती पूर्ण नियंत्रणाखाली आहे आणि बंदोबस्तासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांनी दहा पथके स्थापन करून दंगेखोरांना पकडण्याची मोहीम वेगवान केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App