‘’मला उद्धव ठाकरेंना विचारायंच आहे, काय होतास तू काय झालास तू अरे असा कसा वाया गेलास तू.’’ असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
विशेष प्रतिनिधी
नागपूर : उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना “राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय”, असं म्हटल्याने, आता राजकीय वातावरण चांगलच तापल्याचे दिसत आहे. भाजपाने या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीह उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे. नागपूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेत बोलताना फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. Deputy Chief Minister Devendra Fadnavis strong response to Uddhav Thackerays criticism
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘’एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काँग्रेसचे अध्यक्ष लांच्छन लावतात आणि त्याचवेळी आमच्यासोबत वर्षानुवर्षे असणारे आमचे मित्र त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि सत्ता उपभोगण्याचा प्रयत्न करतात. मला राहुल गांधींवर काहीच बोलायचं नाही. त्यांच्यावर बोलून माझ्या शब्दांची वाफ मी का वाया घालवू. पण मला उद्धव ठाकरेंना विचारायंच आहे, काय होतास तू काय झालास तू अरे असा कसा वाया गेलास तू.’’
‘’चाणक्य जे म्हणाले तेच आता खरं होतंय’’ उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर देवेंद्र फडवणवीसांचा ‘मास्टरस्ट्रोक’!
याचबरोबर ‘’मला आठवतो तो दिवस ज्या दिवशी तो काँग्रेसचा एक नेता मणिशंकर ज्याच्यात मणी नाही आणि शंकरही नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरां ज्या दिवशी अशाचप्रकारे तो माफीवीर बोलला होता आणि पाटी काढली होती. तेव्हा हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वत: जोडा घेऊन निघाले आणि मणिशंकर अय्यरच्या थोबाडीत जोडा मारला होता. तुम्ही सांगताना त्यांचं नाव, म्हणता ना माझ्या वडिलांना त्यांनी पळवलं. अरे मग वडिलांचे विचार गेले कुठे? तुमच्या वडिलाचे विचार गेले कुठे, त्यांची कृती गेली कुठे? तुम्ही त्यांची कृती सोडून दिली म्हणून आम्हाला आता मैदानात उतरावं लागतय. आमच्या एकनाथ शिंदेंना मैदानात उतरावं लागतय. कारण, वारसा जन्माने मिळत नाही वारसा कर्माने मिळत असतो.’’ असंही फडणवीसांनी सांगितलं.
‘’फडणवीसांवर टीका करताना तोंड सांभाळून बोला, आज तुम्हाला शेवटची संधी दिली आहे, यानंतर बोललात तर…’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम!
याशिवाय, ‘’तुम्ही(उद्धव ठाकरे) मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या मुखपत्राने एक लेख छापला आणि त्यात म्हटलं माफीवीर व सावरकरांना बलात्कार केला होता. सावरक समलैंगिक होते. इतकं भयानक लिहिलं, परंतु यांना खुर्चीची चिंता होती म्हणून साधा निषेधदेखील केला नाही. त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले आणि यांचे बाळराजे ते ज्यावेळी महाराष्ट्रात येऊन सावरकरांना शिव्या देत होते, त्यावेळी त्यांच्या गळ्यात गळा घालून त्यांच्यासोबत पायी चालले होते. म्हणून म्हटलं कोण होतास तू काय झालास तू. अरे सत्ता येईल, सत्ता जाईल पण इतिहासात तुमचं नाव सावरकर विरोधकांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांच्या यादीत असेल, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे.’’ असं यावेळी फडणवीस म्हणाले.
LIVE | Swatantryaveer Savarkar Gaurav Yatra, Nagpurस्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा | नागपूर@nitin_gadkari @cbawankule @SudhanshuTrived#SavarkarGauravYatra #gauravyatra #स्वातंत्र्यवीर_सावरकर #आम्ही_सारे_सावरकर #BJP #Swatantryaveer #VeerSavarkar https://t.co/secRsB6JWj — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) April 4, 2023
LIVE | Swatantryaveer Savarkar Gaurav Yatra, Nagpurस्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा | नागपूर@nitin_gadkari @cbawankule @SudhanshuTrived#SavarkarGauravYatra #gauravyatra #स्वातंत्र्यवीर_सावरकर #आम्ही_सारे_सावरकर #BJP #Swatantryaveer #VeerSavarkar https://t.co/secRsB6JWj
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) April 4, 2023
तर उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, ‘’आज ते मला म्हणाले फडतूस गृहमंत्री उद्धव ठाकरे फडतूस नही काडतूस हू मै, झुकेंगा नही साला घुसेगा. घुसेगा…सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत जे राहतात, त्यांच्या बद्दल माझ्या मनात किंचतही सन्मान राहू शकत नाही. म्हणून सावरकर गौरव यात्रा ही तोपर्यंत सुरू राहील, जोपर्यंत सडक्या आणि कुचक्या मेंदूचे लोक सावरकरांचा अपमान करत राहतील. तोपर्यंत सावरकरप्रेमी हे रस्त्यावर उतरून या कुचक्या, सडक्या डोक्यांच्या लोकांचा निषेध करत राहतील.’’
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App