अकोल्यातील मंदिर दुर्घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मंदिरावर झाड कोसळून घडलेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून ३० पेक्षा अधिकजण जखमी आहेत.

विशेष प्रतिनिधी

नागपूर : राज्यभरात काल अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने अक्षरशा झोडपून काढले. या अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यातील पारस गावात काल सायंकाळी एक भीषण दुर्घटना घडली. पावसामुळे मंदिरवरील पत्र्याच्या शेडवर जुने झाड कोसळून घडलेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला तर ३०-४० जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अकोलाच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी ही माहिती दिली आहे.  यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. Deputy Chief Minister Devendra Fadnavis reaction to the temple tragedy in Akola

फडणवीस म्हणाले,  ‘’पारसची घटना अतिशय गंभीर आणि दुर्दैवी आहे. त्या ठिकाणी शेडवर झाळ कोसळलं आणि त्यानंतर ते शेड कोसळून सात भाविकांचा मृत्यू झाला आहे आणि ३७ लोक जखमी आहेत. मी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो. जखमींना योग्य तो उपचार मिळाला पाहिजे, अशाप्रकारची सूचना मी दिलेल्या आहेत.’’

याचबरोबर ‘’जखमींच्य उपचाराचा खर्च राज्य सरकारच्यावतीने करण्यात येईल. ते मृत्यूमुखी पडले आहेत, त्यांच्या कुटुंबियांनाही मुख्यमंत्र्यांशी बोलून मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांच्या परिवाराला मदत देण्यात येईल. एकूणच या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, आमच्या सगळ्या संवेदना त्या परिवारांच्या सोबत आहेत.’’ असंही फडणवीस म्हणाले.

https://youtu.be/x5nFOIriWww

याचबरोबर ‘’अवकाळी पावसाच्या संदर्भात पंचनाम्यांचे आदेश दिलेले आहेत, प्राथमिक अंदाजही आमच्याकडे आलेले आहेत. अंतिम अंदाज आल्यावर माहिती देण्यात येईल.’’ अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पारस गावात बाबाजी महाराज मंदिरासमोर सायंकाळच्या महाआरतीनंतर प्रसाद वाटपाला सुरुवात झाली. मात्र याच दरम्यान वादळी वारा आणि पावसामुळे मोठे जुने कडुलिंबाचे झाड पत्र्याच्या शेडवर कोसळले. या शेडखाली अनेक भाविक उभे होते. त्यातील अनेक जण त्याखाली दबले गेले.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis reaction to the temple tragedy in Akola

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub