‘’…हे लक्षात आल्यानेच उद्धव ठाकरे बावचळल्यासारखे बोलताय’’ फडणवीसांनी लगावला टोला!

Ex CM Devendra Fadnavis Criticizes Thackeray Govt Over Petrol Hike Issue

‘’अनेक जणांचे बुरखे फाटणार आणि काहीजण नागडेही होणार’’ असा सूचक इशाराही फडणवीसांनी दिला आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  मुंबई महापालिकेतील विविध घोटाळ्यांसंदर्भात ऑडिटर अँड कंट्रोलर जनरल अर्थात कॅगने मारलेल्या ताशेऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व घोटाळ्यांच्या चौकशीचे आदेश दिले. त्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली. कोरोना काळात झालेले 12000 कोटींचे घोटाळे त्यामुळे स्कॅनर खाली आले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सूचक इशारा देत, उद्धव ठाकरेंच्या टीकेलाही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray over corruption in Mumbai Municipal Corporation

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘’उद्धव ठाकरेंचा आक्रोश मी समजू शकतो, कारण त्यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई महानगरपालिकेत 12,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आणि आता मुख्यमंत्र्यांनी त्यावर एसआयटी नेमली आहे. अनेक लोकांचे बुरखे फाटणार आणि काहीजण नागडेही होणार आहेत.’’

याचबरोबर ‘’मध्यंतरी दोन-अडीच वर्षांमध्ये उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने जी ‘गॅंग’ मुंबई महापालिकेत काम करत होती, त्या ‘गँग’चे आता काही खरे नाही हे लक्षात आल्याने उद्धव ठाकरे आता बावचळल्यासारखे बोलत आहेत.’’ असा टोलाही फडणवीसांनी यावेळी लगावला.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray over corruption in Mumbai Municipal Corporation

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात