माहीमच्या बेकायदा मजारीवर शिंदे – फडणवीस सरकारचा बुलडोझर; राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर 12 तासांत कारवाई!!

प्रतिनिधी

मुंबई : माहीमच्या बेकायदेशी मजारी संदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कालच्या गुढीपाडवा मेळाव्यात व्हिडिओ दाखवून इशारा दिला आणि शिंदे – फडणवीस सरकारने अवघ्या 12 तासांत कारवाई करीत त्या बेकायदेशीर मजारीवर सरकारचा बुलडोझर चालविला. तिथला हिरवा झेंडा हटविला. त्या मजारी भोवतीचे बाकीचे बेकायदा बांधकाम आज सकाळी 7.00 नंतर कारवाई करून तोडले आहे. राज ठाकरेंनी इशारा दिल्यानंतर अवघ्या 12 तासात ही कारवाई झाल्याने राज ठाकरे इफेक्ट कसा असतो??, याचेच प्रत्यंतर महाराष्ट्राला आले आहे. Demolition drive started at the encroached site of ‘Dargah’ amid heavy police deployment at Mahim beach in Mumbai

माहीमच्या समुद्रात ही कुणाची समाधी बांधली आहे माशाची एका पिंगवींची पेंग्विनची असा सवाल राज ठाकरे यांनी कालच्या गुढीपाडवा मेळाव्यात शिंदे – फडणवीस सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनावर कोरडे ओढले होते. पण आज सकाळीच महापालिका प्रशासन आणि पोलीस यांनी धडक कारवाई करून समुद्रातील सर्व बेकायदा बांधकाम पाडून टाकले आणि तिथे आता पूर्णपणे जागा मोकळी करून टाकली.

यापुढे आता सांगली जिल्ह्यातील कुपवाड मधील मंगलमूर्ती कॉलनी जी बेकायदा मशीद उभी राहत आहे, त्या संदर्भात शिंदे – फडणवीस सरकार नेमकी कोणती भूमिका घेणार??, हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. कारण राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात माहीमच्या बेकायदा मजारीचा विषय काढण्याआधी मंगलमूर्ती कॉलनीतील बेकायदा मशीद आणि तिथली गुंडगिरी हा विषय व्हिडिओ सह मांडला होता. त्यामुळे आता माहीमच्या बेकायदा मजारीवर बुलडोझर चालविल्यानंतर सांगली जिल्ह्यातील कुपवाड मधील मंगलमूर्ती कॉलनीतील बेकायदा मशिदीवर शिंदे – फडणवीस सरकार काय कारवाई करणार??, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

https://youtu.be/IdW7TMSwFKk

Demolition drive started at the encroached site of ‘Dargah’ amid heavy police deployment at Mahim beach in Mumbai

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात