Delhi : दिल्ली निवडणुकीत पाशवी बहुमत टिकवण्याचे केजरीवालांपुढे आव्हान, तर 2013 ची परिस्थिती आणायची भाजपला इर्षा!!

Delhi

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूक नियोजित वेळेमध्ये जाहीर झाल्या. यात 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 8 फेब्रुवारी रोजी निकाल लागणार आहेत. यावेळी दिल्लीच्या लाडक्या बहिणी उर्फ प्यारी दीदींना कधी नव्हे, एवढे राजकीय महत्त्व आले असून भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांनी सगळ्या योजना या महिलांभोवतीच केंद्रित केल्या आहेत.

पण या तिन्ही पक्षांच्यासाठी आव्हाने मात्र वेगवेगळी आहेत. आम आदमी पार्टी पुढे 2020 आणि 2015 या निवडणुकांसारखे पाशवी बहुमत टिकवण्याची आव्हान असून 2025 मध्ये 60 + टार्गेट ठेवणे पक्षाला अवघड झाले आहे. कारण आम आदमी पार्टीला 2015 मध्ये 67, तर 2020 मध्ये 62 जागा मिळाल्या होत्या. सलग तिसऱ्या निवडणुकीत 2025 मध्ये तेवढ्याच जागा टिकवण्याचे सगळ्यात मोठे आव्हान अरविंद केजरीवाल यांच्या पक्षापुढे आहे.

पण या निवडणुकीचे वैशिष्ट्य एक वेगळे वैशिष्ट्य असे की, 2015 आणि 2020 मध्ये अरविंद केजरीवालांची जी प्रतिमा बिनडागी होती, ती आता पूर्ण डागाळली असून दारू घोटाळ्याचा सगळ्यात मोठा ठपका केजरीवाल यांच्यावर लागल्याने त्यांना तुरुंगवारी करावी लागली आहे. शिवाय आधीच्या दोन्ही निवडणुकांमध्ये केजरीवाल हे मुख्यमंत्री होते, पण 2025 च्या निवडणुकीत केजरीवाल मुख्यमंत्री नाहीत. त्यांच्या ऐवजी अतिशय मारले ना यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नेतृत्वाखाली निवडणूका लढवाव्या लागत आहेत. याचा दुष्परिणाम आम आदमी पार्टीच्या परफॉर्मन्सवर होण्याचा सगळ्यात मोठा धोका उघडपणे दिसतो आहे.

त्या उलट भाजप पुढे 2013 चा परफॉर्मन्स दाखवण्याचे आव्हान असून गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपची आकडेवारी सिंगल डिजिट वर घसरली होती, ती आता डबल डिजिट करण्याचे हे आव्हान आहे. 2013 मध्ये भाजपला 31 जागा मिळाल्या होत्या. आम आदमी पार्टीला 28 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला 8, तर इतर छोट्या पक्षांना 3 जागा मिळाल्या होत्या. त्याच निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी काँग्रेसला मागे सरून भाजप पुढे मुख्य आव्हान बनून समोर आली होती. अर्थात 2013 मध्ये साहेबसिंग वर्मा यांच्यासारखे दिग्गज नेते भाजपचे सुकाणू हाकत होते. सुषमा स्वराज, अरुण जेटली वगैरे नेते तेव्हा हयात होते. आता मात्र भाजप पूर्णपणे नव्या पिढीच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे. साहेब सिंग वर्मा यांचे चिरंजीव प्रवेश वर्मा स्वतः केजरीवालांना आव्हान देत निवडणुकीत उतरले आहेत.

काँग्रेससाठी ही निवडणूक काहीही गमवायचे नाही अशीच आहे कारण काँग्रेसचे मूळात गेल्या दोन निवडणुकांमध्ये 0 आमदार निवडून आले होते. त्यामुळे काँग्रेसचा एक जरी आमदार निवडून आला तरी तो पक्षासाठी मोठा लाभ असणार आहे. त्या उलट 2020 मध्ये भाजपचे 8 आमदार निवडून आले होते. त्यामुळे भाजपला ही संख्या 8 या सिंगल डिलीट करून 31 डबल डिजिट पर्यंत नेण्याचे खरे आव्हान आहे.

Delhi Vidhansabha election Aap and bjp

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात