ओबीसी आरक्षणातील दिरंगाईचा फटका; मुंबईसह १० महापालिकांवर प्रशासक नियुक्तीची वेळ!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ओबीसी आरक्षणातील दिरंगाईमुळे महापालिका निवडणूका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईबरोबरच ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, पिंपरी चिंचवड, सोलापूरसह १० महापालिकांवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहेत. राज्य निवडणूक आयोग लवकरच याबाबत सरकारला सूचना करणार आहे. Delay in OBC reservation; Time for appointment of administrators in 10 Municipal Corporations including Mumbai !!

राज्यातील ठाकरे – पवार सरकार ट्रिपल टेस्टच्या आधारे एम्पिरिकल डेटा सादर करू शकले नाही म्हणून ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केले आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नयेत, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कोणत्याही महानगरपालिकांतील पदाधिका-यांना मुदतवाढ दिली जाणार नाही, असं नगरविकास विभागातील सूत्रांनी म्हटलं आहे. कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षण लागू झाल्याशिवाय महापालिका निवडणुका होऊ नयेत, यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत.



या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ फेब्रुवारीला आहे. त्यावेळी मागासवर्ग आयोगाच्या प्राथमिक अहवालाचा हवाला देत अंतिम अहवालापर्यंत निवडणुका लांबणीवर टाकण्याची विनंती न्यायालयास करण्याची तयारी सरकारकडून सुरू असल्याचे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले आहे. राज्य सरकारने गेल्याच वर्षी मुंबई तसंच महाराष्ट्र महापालिका अधिनियमात सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार मुदत संपलेल्या महापालिकेवर प्रशासकच नियुक्त केला जाईल. पालिकेतील नगरसेवकांना पाच वर्षांपेक्षा अधिक मुदतवाढ दिली जाणार नाही, अशी तरतूद केली आहे.

Delay in OBC reservation; Time for appointment of administrators in 10 Municipal Corporations including Mumbai !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात