वृत्तसंस्था
अमरावती : मेळघाटातील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी नेमलेल्या समितीने अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिली. परंतु, हा अहवाल एकतर्फी असल्याचा आरोप समितीच्या महिला सदस्यांनी केला. तसेच त्या अहवालावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने खळबळ उडाली आहे.
Deepali Chavan’s suicide report in controversy, clean chit to authorities unilateral; Women members refuse to sign the report
नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. के. राव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. चव्हाण यांनी मनोधैर्य खचल्याने आत्महत्या केल्याचा अहवाल दिला. विशेष म्हणजे निवृत्तीच्या अखेरच्या दिवशी राव यांनी अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिली.
हो! मनोधैर्य खचल्यामुळेच वनाधिकारी दीपाली चव्हाणला तरुणपणी आत्महत्येचे पाऊल उचलावे लागले. प्रश्न असा आहे,की मनोधैर्य का व कुणामुळे खचले?समितीचा फार्स केवळ क्लीनचिट देण्यासाठी होता? सुदैवाने महिला अधिकाऱ्यांनी अहवालावर स्वाक्षरीस नकार दिलाय. चाड असेल तर सरकारने कठोर कारवाई करावी. pic.twitter.com/zRRfBHGmFu — Vijaya Rahatkar (मोदी जी का परिवार) (@VijayaRahatkar) September 4, 2021
हो! मनोधैर्य खचल्यामुळेच वनाधिकारी दीपाली चव्हाणला तरुणपणी आत्महत्येचे पाऊल उचलावे लागले. प्रश्न असा आहे,की मनोधैर्य का व कुणामुळे खचले?समितीचा फार्स केवळ क्लीनचिट देण्यासाठी होता? सुदैवाने महिला अधिकाऱ्यांनी अहवालावर स्वाक्षरीस नकार दिलाय. चाड असेल तर सरकारने कठोर कारवाई करावी. pic.twitter.com/zRRfBHGmFu
— Vijaya Rahatkar (मोदी जी का परिवार) (@VijayaRahatkar) September 4, 2021
हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण
(वय ३२) यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवर गोळी झाडून गेल्या २५ मार्च रोजी आत्महत्या केली होती. तीन सुसाईड नोट लिहून ठेवल्या होत्या. यात चार पानी नोटमध्ये विनोद शिवकुमार हाच आत्महत्येस कारणीभूत असल्याचे म्हटले होते. एम. एस. रेड्डी यांनी विनोद शिवकुमार याचे कारनामे वेळीच रोखले असते, तर हा प्रसंग ओढवला नसता, या बाबीचा दीपाली यांनी स्पष्टपणे उल्लेख केला होता.
अहवाल एकतर्फी, चार महिला सदस्यांचा आरोप
एम. के. राव यांचा एकतर्फी अहवाल महिला सदस्यांनी नाकारला आहे. आम्ही विनोद शिवकुमार व श्रीनिवास रेड्डी यांच्या कृतीचे समर्थन केलेले नाही, असेही महिला सदस्यांनी स्पष्ट केले आहे.
राव यांनी ३१ ऑगस्ट रोजी समितीची तडकाफडकी बैठक बोलावली. मात्र तीन उपसमितीच्या अहवालावर चर्चा न करता वनपाल प्रमुख पी. साईप्रसाद यांच्याकडे ३१ ऑगस्ट रोजी स्वतः राव यांनी अहवाल पाठवला. त्यामुळे त्याच्यावर स्वाक्षरी करण्यास चार महिला सदस्यांनी नकार दिला. यात वनविकास महामंडळाच्या मुख्य महाव्यवस्थापक मौरा (अय्यर त्रिवेदी, मेळघाटच्या उपवनसंरक्षक पीयूषा जगताप, अमरावती येथील सहायक वनसंरक्षक ज्योती पवार, वनपरिक्षेत्राधिकारी विजया कोकाटे यांचा समावेश आहे.
अहवालावर चर्चा न करता राव यांनी तयार केलेला स्वतःचाच अहवाल समितीपुढे ठेवला. दीपालीने आत्महत्या का केली. याबाबत आधारहीन व काल्पनिक रचना करण्यात आली. आम्ही हरिमाल येथे घटनास्थळी जाऊन प्रत्यक्षात भेटी दिल्या. अधिकारी कर्मचाऱ्यांचे जवाब नोंदविले. त्यामुळे त्यानी विनोद शिवकुमार व श्रीनिवास रेडी यांच्या कृतीचे समर्थन करण्यास आणि अहवालावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला, असे सदस्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App