विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये सातारा जिल्ह्यात आयटी पार्क साठी जमीन मंजूर केली. त्याचबरोबर महाराष्ट्राचे बायोगॅस धोरण जाहीर केले.
मंत्रिमंडळाचे निर्णय असे :
महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण (सिबीजी), २०२६ जाहीर. प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती, बायोगॅस प्रकल्प पीपीपी, हायब्रीड अन्युईटी तत्वावर राबवणार. यावर्षासाठी पाचशे कोटींची तरतूद. घनकचऱ्याचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन, हरित गृह वायू उत्सर्जन कमी होणार.
(नगर विकास विभाग )
राज्यातील सात आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार मूळ वेतन मिळणार. या पदावरील शिक्षकांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या पद भरतीमध्ये अतिरिक्त गुण मिळणार.
(उच्च व तंत्रशिक्षण विभाग)
सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडी येथे आय. टी. पार्कला जमीन देण्याचा निर्णय. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास ४२. ५५ हेक्टर जमीन देण्यात येणार. सातारा जिल्हा आणि परिसरातील आयटी क्षेत्राला प्रोत्साहन, युवकांना रोजगार – व्यवसायाच्या संधी.
(महसूल विभाग)
राज्यातील कमाल जमीन धारणा मर्यादा नियमानुसार भोगवटादार वर्ग – २ मधून भोगवटादार वर्ग – १ मध्ये रुपांतरणाच्या अधिमूल्याची पुनर्रचना. याबाबतची अधिसूचना काढण्यास मान्यता.
(महसूल विभाग)
Decisions of the Fadnavis Government
महत्वाच्या बातम्या
- अतुल पाटणे, किरण कुलकर्णी, महेंद्र कल्याणकर, मीनल करनवाल, मिताली सेठी आदींना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार प्रदान
- Iran War : इराण युद्धाचा आशियावर जबरदस्त फटका; तेल-वायू पुरवठा खंडित, कारखाने ठप्प, महागाईचा धोका वाढला
- सुप्रिया सुळेंच्या भाषणात भावनांचा महापूर; पण मुख्यमंत्री येण्यापूर्वीच बारामतीतल्या स्टेजवरून गेल्या निघून!!
- Owaisi : ओवैसी म्हणाले- 1947 च्या फाळणीसाठी काँग्रेस जबाबदार; TMC-काँग्रेसला आम्ही निवडणूक लढण्याने त्रास होतोय
Uddhav Thackeray : देश तुम्हाला बेकारांचा कारखाना करायचा का? उद्धव ठाकरे यांचा सवाल, ममतांचे केले कौतुक