विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानक उभ्या असलेल्या शिवशाही बस मध्ये तरुणीवर बलात्कार करून तिला धमकावलेला आरोपी दत्तात्रय गाडे याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कनेक्शन उघड्यावर आले. त्याचा फोटो माजी आमदाराच्या बॅनरवर आढळला आणि खुद्द दत्तात्रय च्या व्हाट्सअप डीपीवर विद्यमान आमदाराचा फोटो आढळला.
स्वारगेट बलात्कार प्रकरणावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आणि काँग्रेसने मोठे आंदोलन उभे केले. शरद पवारांची राष्ट्रवादी यात आघाडीवर राहिली. खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या गृह मंत्रालयावर ठळक प्रश्नचिन्ह उपस्थित करून पुण्यासह महाराष्ट्रात मुली आणि महिला सुरक्षित आहेत का??,असा संतप्त सवाल केला. संजय राऊत यांनी देखील प्रत्येक बलात्कारानंतर सरकार जागे होणार का??, असा दुसरा सवाल केला.
दरम्यानच्या काळामध्ये पुणे पोलिसांनी 13 पथके स्थापन करून आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध सुरू केला. त्याला पकडून देण्यासाठी एक लाख रुपयांचे इनाम जाहीर केले. परिवहन मंत्र्यांनी स्वारगेट बस स्थानकातील 23 सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित केले स्वारगेट बस स्थानकाच्या आगार प्रमुखांचा चौकशी आणि तपास सुरू केला.
*पण ज्या स्वारगेट बलात्कार प्रकरणावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठ्या आंदोलन केले, त्या बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्तात्रय गाडे याचे राष्ट्रवादी काँग्रेस कनेक्शन उघड्यावर आले. दत्तात्रय गाडे हा शिरूर तालुक्यातल्या गुनाट गावचा रहिवासी आहे. तो अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके यांच्या कार्यकर्ता म्हणून शिरूर तालुक्यात वावरत असल्याची माहिती समोर आली. दत्तात्रयाच्या डीपीवर आमदार माऊली कटके यांचा फोटो आहे. त्यापूर्वी शिरूर मध्ये लागलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अशोक पवार यांच्या बॅनरवर देखील दत्तात्रय गाडेचा फोटो आढळला.
पुण्यातल्या बलात्कार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता दत्तात्रेय गाडे मुख्य आरोपी निघाला. नाशिक जिल्ह्यातल्या देवळा शहरात आपल्या हॉटेल वेलकम मध्ये कुंटणखाना चालविणारा सुनील आहे उर्फ गोटू आबा हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी असल्याचे निष्पन्न झाले. पण महाराष्ट्रातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App