Dattatray Bharne : दत्तात्रय भरणे म्हणाले- राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज; पक्ष सोडून गेलो तरी पक्षाला फरक पडणार नाही

Dattatray Bharne

विशेष प्रतिनिधी

सोलापूर : Dattatray Bharne भाजपकडून सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस सुरू असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षाचे संपर्क मंत्री व राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी ग्रामीण आणि शहरातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.Dattatray Bharne

मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, ग्रामीणची बैठक सकाळी पार पडली आता ही दुसरी बैठक शहराची पार पडली आहे. या बैठकीत आम्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. तसेच आज ज्यांनी पक्षात प्रवेश केला त्यांचाही सत्कार करण्यात आला आहे. येणाऱ्या काळात सर्वांच्या सूचनेनुसार अजित पवार यांच्याकडे अहवाल देऊन याबाबत ते निर्णय घेतील. आमचे हेच म्हणणे आहे की महायुतीमध्ये येणारी निवडणूक एकत्र लढवायची. परंतु, काही कार्यकर्त्यांची स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भावना आहे. काही लोकांची महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची भूमिका आहे. परंतु, पक्षाच्या अध्यक्षांच्या सूचनेनुसार सगळ्या प्रभागांवर आपल्या उमेदवारांची चाचपणी करण्याचे ठरवले आहे.Dattatray Bharne



राष्ट्रवादी कॉंग्रेसची संपूर्ण टीम निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज

पुढे बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे जे निर्णय घेतील ते आम्ही मान्य करणार असल्याचे ठरवले आहे. राष्ट्रवादी पक्षात अनेक तरुणांना आपल्याला जबाबदारी मिळावी अशी इच्छा आहे. सगळ्यांना वाटत आहे की पक्षाने आपल्यावर जबाबदारी टाकावी. अनेकांनी पक्षात आज प्रवेश केला आहे. मागे सुद्धा बऱ्याच जणांनी पक्षात प्रवेश केला आहे. येणाऱ्या काळात सुद्धा अनेक मोठे मोठे कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात येण्यास इच्छुक आहेत, मी त्यांचे नाव सांगत नाही. पण अनेकांना पक्षात येण्याची इच्छा आहे. अजितदादांच्या कानावर घालून त्यांचा पक्षप्रवेश निश्चित केला जाणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची संपूर्ण टीम निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे दत्तात्रय भरणे म्हणाले.

दत्तात्रय भरणे जरी पक्ष सोडून गेला तरी पक्षाला फरक पडणार नाही

राजकारणात काही गोष्टी असतात की ज्यावेळेस जो प्रवेश होईल त्यावेळी ते सांगितले जाते. खूप चांगले नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात येणार आहेत. अजून तरी आमच्या कानावर नाही आले की आमच्या पक्षातून कोणी जात आहे. दत्तात्रय भरणे जर पक्ष सोडून गेला तर पक्षाला आणि अजित दादांना त्याचा फरक पडणार नाही. राष्ट्रवादीची टीम सगळीकडे सज्ज आहे. अनेक नेते आमच्या पक्षात येण्यास इच्छुक आहेत. तसेच आजच्या बैठकीला अनेक पदाधिकारी नसल्याचे पत्रकारांनी विचारले, त्यावर बोलताना भरणे म्हणाले, काही लोकांना अडचणी असतात त्यामुळे कदाचित ते आले नसतील. पण त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. राष्ट्रवादी कॉंग्रेस हा एकसंघ आहे. या निवडणुकीत मागच्या वेळेस पेक्षा राष्ट्रवादी पक्षाचे आकडे जास्त दिसतील.

महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत, पण यासंदर्भातील निर्णय हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार आहेत. एका-एका वॉर्डात 10-10 कार्यकर्ते इच्छुक असतील तर त्या ठिकाणी वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो. आज तरी आम्ही महायुतीमधून निवडणूक लढवणार आहोत. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होऊ शकतात, असेही दत्तात्रय भरणे म्हणाले.

पाऊस उशिरा पडल्याने पंचनाम्याला उशीर

राज्यातील अतिवृष्टी संदर्भात बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, आपल्याकडे सप्टेंबर महिन्यात पाऊस पडला. शेवटी शेवटी पाऊस पडल्याने पंचनाम्याला उशीर झाला आहे. तसेच एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे 2 हेक्टरपर्यंत शासन मदत करते, आता ते 3 हेक्टर करण्यात आले आहे. त्यामुळे एक हेक्टर वाढल्याने पुन्हा पंचनाम्याला सुरू करत असल्याची माहिती भरणे यांनी दिली आहे.

Dattatray Bharne NCP Ajit Pawar Solapur Ready Elections Mahayuti Strategy

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात