Datta Gade स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला अखेर पोलिसांकडून अटक

Datta Gade

विशेष प्रतिनिधी

पुणे : Datta Gade स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून .मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे. Datta Gade

गाडे याचा युद्धपातळीवर शोध सुरू होता. स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तो आपल्या गुणाट या गावी गेला असल्याचे समोर आले होते. गावकऱ्यांनी त्याला गावात पहिल्याचे समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी गुनाट या गावातच त्याचा शोध घेण्याची ठरवले.

त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. आणि गुनाट गावात आणि आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध सुरू झाला. ड्रोनच्या माध्यमातून उसाच्या परिसरात पोलीस त्याचा शोध घेत होते. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तो एका शेतात पोलिसांना सापडला.

गाडेच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १३ पथके रवाना करण्यात आली होती. तसेच डॉगस्कॉड, ड्रोनच्या साहाय्यानेही शोधमोहीम सुरु होती.

बलात्कार केल्यानंतर आरोपी गाडे थेट जन्मगाव असलेल्या शिरूर तालुक्यातील गुणाट गाव परिसरात गेल्याची माहिती समोर आली होती. परिसरातील शेतात लपवून बसला असण्याची ही शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत होती. त्या दृष्टीने पोलिसांनी श्वान पथक बोलावून त्या मार्फत आरोपीचा शोध घेतला जात होता. अखेर शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास तो स्वारगेट पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांच्या हाताला लागला.

Datta Gade,  Swargate rape case, was finally arrested by the police

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात