प्रतिनिधी
पुणे : एमपीएससी टॉपर दर्शना पवार हिच्या हत्याकांडाचे गूढ पुणे पोलिसांनी उलगडले असून दर्शनाने आरोपी राहुल हंडोरेला लग्नाला नकार दिल्यानेच त्याने राजगडावर नेऊन तिची निर्घृण हत्या केली, अशी माहिती पुणे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.Darshan killed by Rahul Handore for refusing marriage police informs Hang Rahul or we dismember him Darshan mother anger
त्याच वेळी दर्शनाची आई आणि भाऊ यांनी राहुल हांडोरेला फाशी द्या किंवा त्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचे तुकडे करतो, अशी संतप्त भावना व्यक्त केली आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी दर्शना पवार हत्याकांडातील आरोपी राहुल हांडोरेच्या मुसक्या आवळल्या. त्याला मुंबईत अंधेरीतून अटक केली. सध्या पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत. आतापर्यंतच्या चौकशीत राहुलने दर्शनाची लग्नाच्या मुद्यावरून हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
दर्शनाने लग्नाला नकार दिल्यामुळेच राहुल हंडोरे याने तिची हत्या केल्याचे पोलिस अधीक्षक गोयल यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, आरोपीचे नाव समजल्यानंतर त्याला बुधवारी रात्री उशिरा मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली. त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याला लवकरच न्यायालयापुढे हजर केले जाईल. त्यानंतर या गुन्ह्याचा पुढील तपास स्पष्ट होईल.
दर्शनाचे लग्न दुसरीकडे ठरविले होते
राहुलची दर्शनासोबत लग्न करण्याची इच्छा होती. दोघेही एमपीएससीची परीक्षा देत होते. या प्रयत्नांत दर्शनाला प्रशम यश मिळाले. तिने वन विभागाची परीक्षा उत्तीर्ण केली. दर्शना आता फक्त अधिकारी बनण्याची औपचारिकताच उरली होती. पण दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्या एका मुलासोबत ठरवले होते. तिच्या लग्नाची तयारीही सुरू केली होती. यामुळे राहुल हांडोरे अस्वस्थ झाला होता. त्याने मला परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्या, मी सुद्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेन, असे दर्शना आणि तिच्या कुटुंबीयांना सांगितले होते. पण त्याला परीक्षेत अपयश आले. त्यामुळे त्याने दर्शनाची राजगडाच्या पायथ्याशी हत्या केली.
कोण होती दर्शना पवार?
दर्शना दत्तू पवार एमपीएससी परीक्षेत राज्यात 3 ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून तिची निवड झाली होती. त्यामुळे पुण्यातील एका संस्थेकडून तिचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यासाठी 9 जून रोजी दर्शना पुण्याला आली होती. त्यावेळी ती एका मैत्रिणीकडे थांबली होती. त्यानंतर 12 जून रोजी राजगड किल्ल्यावर जात असल्याचे दर्शनाने आपले कुटुंबीय व मैत्रिणींना सांगितले होते.
अचानक झाला होता मोबाइल बंद
राजगडावर जाताना तिच्यासोबत तिचा मित्र राहुल हांडोरे होता. त्यानंतर अचानक तिचा मोबाईल बंद झाला. तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण तिचा कोणताही थांगपत्ता लागला नाही. यामुळे त्यांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवली. त्यानंतर दर्शनाचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी आढळून आला. त्यानंतर झालेल्या शवविच्छेदनात दर्शनाचा खून झाल्याच स्पष्ट झाले. त्यानंतर आता पुणे ग्रामीण पोलिसांनी हांडोरेला मुंबईतून अटक केली.
राहुल हांडोरे कोण आहे?
राहुल हांडोरे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर लातुक्यातील शाह गावाचा रहिवासी आहे. राहुलने Bsc पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तो पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. तिथे राहुल व कोपरगावच्या दर्शनाची ओळख झाली. तपासामध्ये दोघेही नातेवाईक असल्याचेही समोर आले. पुण्यात आल्यानंतर दर्शना राहुलसोबत राजगडला ट्रेकिंगसाठी गेली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली.
पुण्यातील दर्शना पवार हत्याकाडाप्रकरणी पोलिसांच्या हाती वेगवेगळे पुरावे हाती लागत आहेत. दर्शना राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाली होती. काही दिवसांतच ती उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या खुर्चीत विराजमान होणार होती. पण एका घटनेने सर्वकाही उद्धवस्त झाले आणि लेक गेल्यामुळे तिचे अवघे कुटुंबच सुन्न झाले.
पण आता दर्शनाच्या हत्येचे गूढ उकलले आहे. पोलिसांनी राहुल हंडोरेला अटक केल्यानंतर दर्शनाच्या आई आणि भावाने त्याच्याविषयी प्रचंड संताप व्यक्त करून त्याला फाशी देण्याची मागणी केली. अन्यथा त्याला पवार कुटुंबाच्या ताब्यात द्या आम्ही त्याचे तुकडे करतो, अशा संतप्त भावना व्यक्त केल्या
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App