बुधवार सकाळपासून अंमलबजावणी संचालनालय (ED) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांची चौकशी करत आहे. अंडरवर्ल्डशी संबंधित मालमत्तेच्या खरेदी-विक्रीमध्ये नवाब मलिकांच्या कथित सहभागाची एजन्सी चौकशी करत आहे, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, नवाब मलिक यांच्या कार्यालयाने एक ट्विट केले आहे.D Action On Nawab Malik ED inquires about the relationship with the underworld, Nawab Malik said- Don’t be afraid or bow down! Get ready for 2024!
वृत्तसंस्था
मुंबई : बुधवार सकाळपासून अंमलबजावणी संचालनालय (ED) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांची चौकशी करत आहे. अंडरवर्ल्डशी संबंधित मालमत्तेच्या खरेदी-विक्रीमध्ये नवाब मलिकांच्या कथित सहभागाची एजन्सी चौकशी करत आहे, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, नवाब मलिक यांच्या कार्यालयाने एक ट्विट केले आहे.
नवाब मलिक यांच्या कार्यालयाने ट्विटरवर लिहिले की, ‘ना डरेंगे ना झुकेंगे. 2024 साठी तयार राहा!’ त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, ‘नवाब मलिक सातत्याने केंद्र सरकार आणि ईडीच्या विरोधात बोलतात. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई झाली. सत्तेचा दुरुपयोग सातत्याने केला जात आहे.
ना डरेंगे ना झुकेंगे! Be ready for 2024!#WeStandWithNawabMalik — Office of Nawab Malik (@OfficeofNM) February 23, 2022
ना डरेंगे ना झुकेंगे!
Be ready for 2024!#WeStandWithNawabMalik
— Office of Nawab Malik (@OfficeofNM) February 23, 2022
ईडीने 15 फेब्रुवारी रोजी मुंबईत छापे टाकल्यानंतर आणि अंडरवर्ल्डशी संबंधित मालमत्तांची कथित बेकायदेशीर खरेदी आणि विक्री आणि हवाला व्यवहारांसंदर्भात नवीन गुन्हा दाखल केल्यानंतर मलिक यांची चौकशी केली जात आहे.
नवाब मलिक हे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आले आहेत, कारण त्यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबई झोनचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यावर वैयक्तिक आणि सेवेशी संबंधित आरोप केले आहेत. मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीने गेल्या वर्षी अंमली पदार्थ प्रकरणी अटक केली होती. 1993 च्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिमची मृत बहीण, सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फ्रूट, भाऊ इक्बाल कासकर आणि छोटा शकीलच्या नातेवाईकासह 10 ठिकाणी एजन्सीने छापे टाकले होते. आधीच कारागृहात असलेल्या कासकरला गेल्या आठवड्यात एजन्सीने अटक केली होती. पारकर यांच्या मुलाचीही ईडीने चौकशी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App