परभणीत संचारबंदी, इंटरनेटही बंद, दगडफेक-जाळपोळप्रकरणी 40 जण पोलिसांच्या ताब्यात, SRPF चे पथक दाखल

Curfew in Parbhani

विशेष प्रतिनिधी

परभणी : परभणीतील बंदला बुधवारी हिंसक वळण लागले. आंदोलकांकडून शहरातील काही दुकानांची तोडफोड करण्यात आली. तर काही ठिकाणी वाहनांची जाळपोळ करण्यात आली. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. मात्र, जमावाकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक झाली. दंगल नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

दरम्यान, आंदोलकांमध्ये महिलांचा देखील समावेश होता. अनेक महिला रस्त्यावर उतरल्या. त्यांनीही पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. परभणी बंद असताना जी दुकाने सुरू होती, अशी दुकाने आंदोलकांनी पेटवून दिल्याची माहिती आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात हा प्रकार घडला.

आतापर्यंत 40 जण पोलिसांच्या ताब्यात

परभणीतील तोडफोड आणि जाळपोळ प्रकरणी आतापर्यंत 40 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती नांदेड परिक्षेत्राचे IG शहाजी उमप यांनी दिली. अन्य दंगलखोरांचा शोध सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. दंगेखारोंवार कारवाई करण्यात येत असून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असेही ते म्हणाले.

आंदोलक महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक

परभणी शहर बंददरम्यान, काही मोर्चेकरी महिला थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, महिला आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांना आत सोडले. कार्यालयात शिरल्यानंतर आंदोलक महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. काही मोर्चेकऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तोडफोड करण्यात आल्याची माहिती आहे.

परभणीत संचारबंदी लागू

परभणीमध्ये बुधवारी आंबेडकरी अनुयायांकडून पुकारण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. परंतु, या आदेशाला न जुमानता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली.

पुढील आदेशापर्यंत इंटरनेटही बंद

परभणीतील सध्याची परिस्थिती पाहता जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुधवारी दुपारी 1 वाजेपासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहील, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने एका पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.

परभणी शहरातील सात ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. अनेक ठिकाणी बॅनरची तोडफोड करून रस्त्यावर पेटून देण्यात आले आहेत. अग्निशमन दलाच्या वतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परभणीतील आंदोलनाला हिंसक वळण आले असून ठिकठिकाणी जाळपोळ करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून परभणीतील रस्त्यावर मार्च काढण्यात येत आहे.

Curfew in Parbhani, internet also shut down, 40 people in police custody for stone pelting and arson, SRPF team arrives

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात