पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना वेळीच ठेचून काढा; राज ठाकरे यांचे आवाहन


प्रतिनिधी

मुंबई : देशात घातपाती कारवायांसाठी टेरर फंडिंग करणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया PFI संघटनेच्या म्होरक्यांना एनआयए आणि ईडी या केंद्रीय तपास यंत्रणेने अटक केल्याच्या निषेधार्थ पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. Crush the Pakistan Zindabad slogans in time

त्यावेळी पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबरचे नारे लावले. या प्रकरणी बंड गार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक बनले आहेत. अशा घोषणा देणाऱ्यांना सरकारने वेळीच ठेचून काढले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

तुमचा धर्म घ्या, पाकिस्तानात चालते व्हा!!

देशविरोधी घोषणा देणाऱ्या ६० ते ७० जणांवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. एनआयएने छापे घालून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्या होत्या. सरकारने ह्यांना वेळीच ठेचले पाहिजे. ही अटक कशासाठी झाली?

तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, ह्या गंभीर आरोपांखाली…थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी. तरीही ह्या देशद्रोह्यांचे समर्थन करत जर ह्या PFI च्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल, तर तुमचा धर्म घ्या, आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेरं आमच्या देशांत चालणार नाहीत, असे राज ठाकरे यांनी निक्षून सांगितले आहे.

माझी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, फक्त ह्या देशद्रोह्यांनाच नव्हे तर त्यांच्या ह्या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की, यापुढे त्यांना पाण्यासाठी देखील (पा) उच्चारता येणार नाही, नाहीतर आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत.

हिंदुस्थानातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहट्ट्यांच्या मुठी जर आवळल्या तर ह्या हरामखोरांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका. ह्या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Crush the Pakistan Zindabad slogans in time

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात