प्रतिनिधी
मुंबई – मुंबईत आज दुपारपर्यंत राणा दांपत्य आणि शिवसैनिक यांच्यात राजकीय नाट्य रंगले. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणण्याचे आव्हान दिल्यानंतर आधीच शिवसैनिक संतापले होतेच. त्यातच सकाळी राणा दांपत्य विमानाने मुंबईत दाखल झाल्याची बातमी आली तेव्हा तणाव वाढला. Crowd of Shiv Sainiks around Matoshri, police notice to Rana couple
राणा दांपत्याचा शोध घेतला जातोय, अशी बातमी आली. पण राणा दांपत्य खारला आपल्या घरीच होते. महाराष्ट्रातले बंटी – बबली मुंबईला गेलेत. पण आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही, असे वक्तव्य संजय राऊतांनी नागपूरात केले.
पण त्याचवेळी शिवसैनिकांनी पुन्हा एकदा मातोश्री भोवती गर्दी करून राणा दांपत्याविरोधात घोषणाबाजी केली. वास्तविक संजय राऊतांनी एकदा बंटी – बबली म्हणून राणा दांपत्याला झटकून टाकल्यानंतर शिवसैनिकांनी मातोश्रीभोवती गर्दी करून वातावरण तापते ठेवले. आपलेच सरकार असताना शिवसैनिकांनी कायदा हातात घेऊ नये, असा टोला भाजपचे आमदार आशिश शेलारांनी पुण्यातून लगावला.
-वायदा २३ चा, नोटीस २२ ला
दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी राणा दांपत्याच्या खारच्या घरी जाऊन त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली. राणा दांपत्याने सही करून ती नोटीस स्वीकारली… पण यातले खरे राजकीय नाट्य उद्या ता. २३ एप्रिलला घडण्याची शक्यता आहे. कारण २३ तारखेच्या हनुमान चालीसा वाचनाचा राणा दांपत्याचा वायदा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App