विशेष प्रतिनिधी
सांगली : सत्तेवर येण्याच्या आधी ज्यांनी कर्जमाफीची घोषणा केली त्यांनी सत्तेवर आल्यावर मात्र सोयीस्करपणे कर्जमाफीला बगल दिली, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil यांनी केली.
पाटील म्हणाले, लाडक्या बहिणींना एकवेळ १५०० रुपयाचे २१०० रुपये पण दिले जातील पण ते पुढच्या निवडणुकीच्या तोंडावर दिले जातील. आता आम्ही कोणतीही घोषणा करू शकत नाही, कारण आमचा जोरात पराभव झाला आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर ३ लाख ६८९ शेतकऱ्यांना ३४१ कोटी ४८ लाख रुपये कर्जमाफी दिली होती. आपल्या जत तालुक्यातील १२ हजार ७१० शेतकऱ्यांना ६७ कोटी ६४ लाख रुपये कर्जमाफी दिली.
मोबाइलवरील व्हॉटसॲपचा वापर आता सार्वत्रिक झाला असून यावर येणारी माहिती केवळ गुन्हेगारी स्वरूपाची आणि राजकीय टीका-टिप्पणीचीच अधिक असते. मोबाइलवर बलात्काराच्या घटनेची माहिती घेत असतानाच, एखादी खून झाल्याची माहिती हाती येते, तर दुसऱ्या बाजूला राजकीय आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पणीची माहिती मिळते, अशी खंत व्यक्त करत पाटील म्हणाले.
एक का अनेक लफडी या मोबाइलच्या माध्यमातून वापरकर्त्यांच्या मनावर आघात करत आहेत. यामुळे मूळ प्रश्न दुर्लक्षितच होत आहे. बेरोजगारीसारखी गंभीर समस्या आ वासून समोर असताना त्याकडे तरुण वर्गाचे दुर्लक्ष होत आहे. उद्याचे भविष्य हाती असताना तरुणाई आभासी जगात वावरत असून याचे गंभीर परिणाम भावी पिढीवर होणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App