हा उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या जीवनकौशल्य व शारीरिक शिक्षणविषयक उद्दिष्टांशी सुसंगत आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘प्रधानमंत्री उषा’ योजनेंतर्गत संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती येथील ‘बहुउद्देशीय सभागृह व आंतरगृह क्रीडा इमारती’चे भूमिपूजन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज बहुउद्देशीय सभागृह व आंतरगृह क्रीडा इमारतीसाठी प्रधानमंत्री उषा योजनेंतर्गत 8 कोटी व विद्यापीठ साधारण निधीमार्फत 5 कोटी अशी एकूण 13 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
बहुउद्देशीय सभागृह व आंतरगृह क्रीडा इमारतीची वैशिष्ट्ये –
– विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडाप्रेम आणि संघभावना जोपासण्यासाठी प्रभावी पायाभूत सुविधा निर्माण करणे
-संकुलामध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, जिम्नॅस्टिक्स, बुद्धीबळ, योग आणि मार्शल आर्ट्स यासारख्या विविध इनडोर क्रीडा सुविधांचा समावेश
-बहुउद्देशीय सभागृह केवळ खेळांसाठीच नव्हे तर दीक्षांत समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यशाळा, परिसंवाद, विद्यापीठस्तरीय समारंभ तसेच सामुदायिक उपक्रमांसाठीही
-सभागृह विद्यार्थ्यांना आपले कौशल्य, विचार आणि प्रतिभा व्यक्त करण्यासाठी एक खुले व्यासपीठ प्रदान करेल.
हा उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या जीवनकौशल्य व शारीरिक शिक्षणविषयक उद्दिष्टांशी सुसंगत असून, विद्यापीठाच्या ‘आरोग्यदायी आणि सक्रिय परिसर’ निर्मितीचा एक भाग आहे. हे संकुल विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि स्पर्धेच्या संधी उपलब्ध करुन देण्यासोबतच विदर्भातून नवोदित क्रीडा प्रतिभा ओळखून त्यांना घडवण्याचे कार्यही करेल. यासोबतच ही नवीन इमारत व सभागृह विद्यापीठाच्या प्रगतीच्या वाटचालीमध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन आणि संबंधित अधिकारी तसेच विद्यापीठाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App