महाराष्ट्रात नव्या दिव्यांग मंत्रालयासाठी 2063 पदेनिर्मिती आणि 1143 कोटींची तरतूद; मुख्यमंत्र्यांची घोषणा

प्रतिनिधी

मुंबई : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यासाठी २ हजार ६३ पदांची निर्मिती करण्यात आली असून, १ हजार १४३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. अशा प्रकारे दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. Creation of 2063 posts and provision of 1143 crores for new Ministry of Disabled Persons in Maharashtra

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार बच्चू कडू, यामिनी जाधव, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, बार्टीचे महासंचालक धम्म ज्योती गजभिये उपस्थित होते. मुखमंत्र्यांच्या हस्ते विविध क्षेत्रामध्ये कार्य करण्याऱ्या दिव्यांग बांधवांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच दिव्यांगावर आधारित दिनदर्शिकेचे मुख्‍यमंत्र्याच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.



२४ दिवसांत झाला निर्णय

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, या स्वतंत्र मंत्रालयासाठी सचिव दर्जाचे अधिकारी असतील. दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी जे काही आवश्यक आहे, ते सगळे हे मंत्रालय करेल. कुठलेही धोरण ठरवताना आता दिव्यांगांचे मत जाणून घेतले जाईल. हा निर्णय फक्त २४ दिवसांत झाला आहे. दिव्यांगाच्या मागण्यांबाबत आंदोलनामध्ये दिव्यांगावर झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यासाठी गृह विभागाला सूचना करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Creation of 2063 posts and provision of 1143 crores for new Ministry of Disabled Persons in Maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात