विशेष प्रतिनिधी
पुणे : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांनी कोविड- १९ च्या बूस्टर डोसची किंमत कमी करण्याची घोषणा केली आहे. SII चे सीईओ आदर पूनावाला म्हणतात की सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने खाजगी रुग्णालयांसाठी कोविडशील्ड लसीची किंमत ६०० रुपयांवरून २२५ रुपयांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. SII ने कोविशील्ड लसीची किंमत ६००रुपये निश्चित केली होती, तर भारत बायोटेच्या लसीची किंमत १२०० रुपये होती. Covidshield vaccine for private hospitals now costs Rs 225
आज आदर पूनावाला यांनी याबाबत एक ट्विट केले आहे, आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर, SII ने खाजगी रुग्णालयांसाठी कोविशील्ड लसीची किंमत प्रति डोस ६०० रुपयांवरून २२५ रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना प्रतिबंधात्मक डोस देण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे आम्ही सर्वजण पुन्हा एकदा कौतुक करतो.
भारत बायोटेकनेही किंमत कमी केली
तर भारत बायोटेकनेही कोव्हॅक्सीन या लसीच्या बूस्टर डोसच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या संयुक्त संचालक सुचित्रा एला यांनी सांगितले की आम्ही खाजगी रुग्णालयांसाठी कोव्हॅक्सीन किंमत १२०० रुपयांवरून २२५ रुपयांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App