प्रतिनिधी
मुंबई : Karuna Munde करुणा मुंडे यांना २ लाख रुपये पोटगी देण्याचा वांद्रे कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय शनिवारी माझगाव सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे. या आदेशामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा झटका बसला आहे. धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होते.Karuna Munde
करुणा मुंडे यांनी न्याय मागण्यासाठी वांद्रे कौटुंबिक न्यायालय धाव घेतली होती. त्या वेळी कौटुंबिक न्यायालयाने करुणा मुंडे यांना दरमहा २ लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते. मात्र, वांद्रे न्यायालयाच्या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. या आव्हान याचिकेवर शनिवारी सुनावणी झाली. आजच्या सुनावणीत करुणा मुंडे यांच्याकडून मुलांचे पासपोर्ट जन्माचे प्रमाणपत्र बँकेचे कर्ज यासारखे विविध कागदपत्रे सादर करत बायको असल्याचा दावा करणारी कागदपत्रे कोर्टात सादर केली.
माझ्याशी लग्न करणाऱ्याला २० कोटींची ऑफर : करुणा
धनंजय मुंडे यांनी मला रस्त्यावर आणले. मला हिरोइन होण्याची ऑफर होती, पण मी पतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. मला प्रेमात फसवून माझ्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे २० कोटी रुपये देणार होते, असा आरोप करुणा मुंडे-शर्मा यांनी कोर्टाबाहेर पत्रकारांशी बोलताना केला.
मी मुंडे यांची १९९६ पासून पत्नी असल्याचे पुरावे सादर केले. माझ्याकडे रेकॉर्डिंगही आहे. त्यांनी तयार केलेले मृत्युपत्र २०१६ चे आहे. त्यावर त्यांची स्वाक्षरी व अंगठा आहे. त्यातही करुणा शर्मा आपली पहिली पत्नी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेषतः लग्नाचे सर्टिफिकेट माझ्याकडे नसले तरी ते राजश्री मुंडे (धनंजय मुंडे यांच्या पत्नी) यांच्याकडेही नाही. आमचे मंदिरात लग्न झाले होते, असेही त्या म्हणाल्या होत्या. दरम्यान, आता या प्रकरणात धनंजय मुंडे काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शनिवारी झालेल्या सुनावणीत कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंना झटका दिला आहे.
मुंडे काही काळ करुणांसोबत राहिले : सायली सावंत
धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच करुणा शर्मा माझ्या पत्नी नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी तशी कागदपत्रेही कोर्टात सादर केली आहेत. करुणा यांनी सादर केलेल्या वारसापत्राच्या उल्लेखावरून त्या मुंडे यांच्या पत्नी असल्याचे सिद्ध होत नाही. हे वारसा प्रमाणपत्र खोटे आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. धनंजय मुंडे केवळ काही काळ त्यांच्यासोबत राहिले, पण त्या त्यांच्या पत्नी नाहीत, असेही सायली सावंत या वेळी म्हणाल्या होत्या.
करुणा मुंडेंची कागदपत्रे खोटी असल्याचा दावा
करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे अंतिम इच्छापत्र तसेच अन्य सर्व कागदपत्रे न्यायालयात सादर केली. मात्र, करुणा मुंडे यांनी सादर केलेली कागदपत्र खोटी असल्याचा दावा धनंजय मुंडेंकडून करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर माझगाव सत्र न्यायालयाने धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावली. दरम्यान, आता मुंडे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App