मागील आठवड्यात मुंबई पोलिसांनी गुजरातमधून अटक करण्यात आली होती.
प्रतिनिधी
मुंबई : अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न आणि धमकी प्रकरणातील आरोपी अनिल जयसिंघानी याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याला मागील आठवड्यात मुंबई पोलिसांनी गुजरातमधून अटक करण्यात आली होती. Court sends bookie Anil Jaisinghani to 14 day judicial custody
भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील बेपत्ता; पुणे पोलिसांत तक्रार दाखल
बुकी अनिल गेल्या सहा – सात वर्षांपासून फरार होता. त्याच्या विरोधात सात राज्यांमध्ये १६ गुन्हे दाखल आहेत. ते प्रामुख्याने आर्थिक फसवणुकीचे आहेत. अनिल जयसिंघानिया याला पोलिसांच्या कचाट्यातून सोडवण्यासाठीच त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानिया हिने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याशी मैत्री वाढवून त्यांना नंतर ब्लॅकमेल केले.
Amruta Fadnavis threat, bribe and blackmail case | Court sends 'bookie' Anil Jaisinghani to 14-day judicial custody. He was arrested last week from Gujarat. — ANI (@ANI) March 27, 2023
Amruta Fadnavis threat, bribe and blackmail case | Court sends 'bookie' Anil Jaisinghani to 14-day judicial custody.
He was arrested last week from Gujarat.
— ANI (@ANI) March 27, 2023
तसेच १० कोटी रुपयांची लाच देण्याचे आमिष दाखवून अनिल जयसिंघानिया याला पोलिसांच्या कचाट्यातून सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु स्वतः देवेंद्र फडणवीस आणि पोलीस यांनी वेळीच हस्तक्षेप करून अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग पासून वाचविले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App