वृत्तसंस्था
मुंबई : ओपेक प्लस संघटनेचं नेतृत्त्व करणाऱ्या सौदी अरेबिया, रशिया या देशांना अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी तेल उत्पादन वाढविण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे उत्पादन वाढल्यास तेलाच्या किमती कमी होण्याची दाट शक्यता आहे. त्या द्वारे जागतिक अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्यास चालना मिळेल, असा त्यांचा दावा आहे. Countries including Saudi Arabia should increase oil production, urges US President Joe Biden; Oil prices likely to fall
जागतिक अर्थव्यवस्थेला किती खनिज तेलाची आवश्यकता आहे, याचं गणित करून तेल उत्पादक देश लवकरच एक मर्यादा निश्चित करणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी रशिया आणि सौदी अरेबियाला खनिज तेलाचं उत्पादन वाढवण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेतील कंपन्यांना गॅसोलीन दरांमध्ये कपात करण्याचं आवाहन देखील त्यांनी केले आहे.
ओपेक प्लस संघटनेचं नेतृत्त्व सौदी अरेबियाकडे आहे. जगातील तेलाच्या राजकारणात रशियाचं स्थानदेखील महत्त्वाचं आहे. त्यामुळेच बायडन यांनी दोन्ही देशांना तेल उत्पादनात वाढ करण्याचं आवाहन केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात वाढला असताना तेलाच्या दरांमध्ये प्रचंड घसरण झाली. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू असल्यानं खनिज तेलाची मागणी घटली. त्याचा परिणाम तेल उत्पादक देशांच्या अर्थव्यवस्थेवर झाला. त्यामुळे कोरोनात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी तेल उत्पादक देशांनी आता खनिज तेलाचं उत्पादन कमी केलं आहे. त्यामुळे तेलाचे दर वाढले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष बायडन यांनी देत उत्पादक देशांकडे उत्पादन वाढीचा आग्रह धरला आहे. बायडन यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास केवळ अमेरिकेचाच नव्हे, भारताचाही फायदा होईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App