नाशिकमध्ये आत्तापर्यंत २८ लाख ५१ हजार नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलाय. तर, साडेदहा लाख नागरिकांनी दोन्ही डोस घेतलेत.Corona vaccination: Vaccination rate reaches 75% in Nashik district
विशेष प्रतिनिधी
नाशिक : कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येत असून नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा आकडा ७५ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे लसीकरणाचा आकडा वाढल्याने लसीकरणापासून दूर राहिलेल्या नागरिकांवर प्रशासनाला लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे.
नाशिकमध्ये आत्तापर्यंत २८ लाख ५१ हजार नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलाय. तर, साडेदहा लाख नागरिकांनी दोन्ही डोस घेतलेत.अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळांनी दिली आहे
पुढे भुजबळ म्हणाले की, लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मोठमोठे मंदिर तसेच काही समित्यांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याचा विचार आहे. दरम्यान याबाबात जिल्हाधिकारी निर्णय घेतील.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नागरिकांना आवाहन एले आहे की , “सरकारच्या पातळीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम सुरू असलं तरीही प्रत्येक व्यक्तीने स्वतःसह आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App