विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : माजी मंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला असल्याचं त्यांनी ट्विट करून सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांत जे माझ्या संपर्कात होते त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असंही आवाहन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे अधिवेशनातही हजर होते. CORONA UPDATE: BJP leader Radhakrishna Vikhe Patil corona positive; Information given on social media
आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझीटीव्ह आली असल्याने मी स्वतः विलीगीकरणात जात आहे. माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत असल्यामुळे आयोजकांच्या गैरसोयी बद्दल क्षमस्व.माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हीड टेस्ट करावी व काळजी घ्यावी.#CovidTesting — Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar) (@RVikhePatil) December 30, 2021
आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझीटीव्ह आली असल्याने मी स्वतः विलीगीकरणात जात आहे. माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत असल्यामुळे आयोजकांच्या गैरसोयी बद्दल क्षमस्व.माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हीड टेस्ट करावी व काळजी घ्यावी.#CovidTesting
— Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar) (@RVikhePatil) December 30, 2021
आज माझी कोव्हिड टेस्ट पॉझीटिव्ह आली असल्याने मी स्वतः विलीगीकरणात जात आहे. माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत असल्यामुळे आयोजकांच्या गैरसोयीबद्दल क्षमस्व. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हिड टेस्ट करावी आणि काळजी घ्यावी. असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या मुलाला लग्नाला उपस्थिती लावली होती. या लग्न सोहळ्यात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे इतर नेतेही उपस्थिती होते. याआधी राज्याचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना कोरोना झाला आहे. लसीचे दोन्ही डोस घेऊनही त्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोना झाला. वर्षा गायकवाड यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. त्या देखील हिवाळी अधिवेशनात हजर होत्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App