वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे बाधित होणाऱ्यांपेक्षा अधिक असल्याचे शुक्रवारच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण घटल्याचे स्पष्ट होते. Corona Update: 44,493 people released at home; 29,000 affected
राज्यात शुक्रवारी 555 कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्युदर 1.57 टक्के आहे. दरम्यान 44 हजार 493 जण बरे झाले असून 29 हजार 644 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. आतापर्यत 50 लाख 70 हजार 801 जण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट हा 91.74 टक्के एवढा झाला आहे.
आतापर्यंत प्रयोगशाळेत 3,24,41,776 नमुने तपासण्यात आले. त्यात 55,57,092 पॉझिटिव्ह आढळले आहेत. पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण 17.04 टक्के एवढे आहे. राज्यात सध्या 27,94,476 व्यक्ती होम क्वारंटाईंन असून 20946 उक्ती संस्थात्मक क्वारंटाईंन आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App