विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – कोरोनाच्या बाबतीत अजूनही १० टक्क्यांवर संक्रमण दर असलेले ३४ जिल्हे व परिस्थिती गंभीर असलेले केरळसारखे राज्य हा चिंतेचा विषय आहे, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र व केरळसह सहा राज्यांतील परिस्थिती अजूनही काळजी करण्यासारखी आहे. Corona situation in Maharashtra, Kerala is critical
येथील रूग्णसंख्या अजूनही कमी जास्त होत आहे. मागच्या आठवडाभरात देशातील एकूण संख्येच्या तब्बल ६७.७९ टक्के नवीन कोरोना रूग्ण एकट्या केरळमधील होते. मात्र रूग्णसंख्या घटत असली तरी देशाच्या ३४ जिल्ह्यांतील संक्रमण दर १० टक्क्यांवर तर अन्य ३२ जिल्ह्यांतील संक्रमण दर अजूनही ५ ते १० टक्के आहे.
आगामी नवरात्र, दसरा व दिवाळीच्या सणासुदीच्या काळात नागरिकांनी गर्दी टाळणे, आरोग्य नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. यामुळे रूग्णसंख्या पुन्हा वाढणार नाही. केरळव्यतिरिक्त महाराष्ट्र, मिझोराम, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांत अजूनही दररोज नवीन रुग्णसंख्या १० हजारांवर आढळत आहे .केरळमधील स्थिती जास्त चिंताजनक आहे. केरळमध्ये आजही १० लाखांहून जास्त सक्रिय रूग्ण आहेत. देशातील किमान ६६ जिल्ह्यांतील संक्रमण दर ५ ते १० टक्क्यांवर आहे, असे भूषण म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App