वृत्तसंस्था
मुंबई : बनावट कोरोना अहवाल घेऊन विमान प्रवास करण्याचा प्रयत्न प्रवाशांचा फसला आहे. या प्रकरणी मुंबईहून दुबईला जाणाऱ्या ४० प्रवाशांना विमानतळावरच रोखण्यात आले आहे. मुंबई विमानतळावर केलेल्या ‘क्यू आर’ कोड तपासणीत ही बाब उघड झाली. त्यामुळे त्यांना प्रवास करण्यापासून रोखण्यात आले आहे. Corona report of 40 passengers bound for Dubai fake; Stopped at Mumbai Airport
संयुक्त अरब अमिरातीला जाणाऱ्या प्रवाशांना दोनदा कोरोनाची चाचणी करावी लागते. पहिली ४८ तास आधी आणि दुसरी ६ तास आधी. सहा तासांत अहवाल मिळत नाही. त्यामुळे ४ हजार ५०० रुपये मोजून जलद चाचणी करावी लागते. तिचा अहवाल केवळ १३ मिनिटांत मिळतो.
प्रवाशांच्या अहवालावरील ‘क्यू आर’ कोड तपासल्याशिवाय तो मंजूर होत नाही. १२ नोव्हेंबरला मुंबई विमानतळावर दाखल झालेल्या प्रवाशांचा जलद चाचणी अहवाल ‘क्यू आर’द्वारे तपासला. तेव्हा माहितीत तफावत दिसली. सुमारे ४० प्रवाशांचा अहवाल बनावट आल्याने त्यांना विमान प्रवास करण्यापासून रोखण्यात आले. शिवाय जलद आरटीपीसीआर चाचणीसाठी केली जाणारी पूर्वनोंदणी प्रक्रियाही थांबविली, अशी माहिती विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App