Corona in Maharashtra : राज्यात कोरोना संसर्गाचा विक्रमी वेग, २४ तासांत ९१७० नवे रुग्ण, तर ७ मृत्यूंचीही नोंद

Corona in Maharashtra Record rate of corona infection in the state, 9170 new cases in 24 hours, 7 deaths recorded

Corona in Maharashtra : मुंबईत कोरोना संसर्गाने वेग धारण केला आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत कोरोनाचे 6347 नवीन रुग्ण आढळले आहेत. एका व्यक्तीला आपला जीवही गमवावा लागला आहे. महाराष्ट्रात आणि विशेषत: मुंबईत ज्या वेगाने प्रकरणे वाढू लागली आहेत, त्यामुळे प्रशासनाची चिंता अधिकच वाढली आहे. येत्या काही दिवसांत लॉकडाऊनचाही विचार केला जाऊ शकतो, असे विधान मंत्री वडेट्टीवार यांनीही केले आहे. Corona in Maharashtra Record rate of corona infection in the state, 9170 new cases in 24 hours, 7 deaths recorded


वृत्तसंस्था

मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाने वेग धारण केला आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 9170 रुग्ण आढळले, तर सात मृत्यूंची नोंद झाली आहे. एकट्या मुंबईत कोरोनाचे 6347 नवीन रुग्ण आढळले आहेत. एका व्यक्तीला आपला जीवही गमवावा लागला आहे. महाराष्ट्रात आणि विशेषत: मुंबईत ज्या वेगाने प्रकरणे वाढू लागली आहेत, त्यामुळे प्रशासनाची चिंता अधिकच वाढली आहे. येत्या काही दिवसांत लॉकडाऊनचाही विचार केला जाऊ शकतो, असे विधान मंत्री वडेट्टीवार यांनीही केले आहे.

दुसरीकडे, राज्यात दिवसभरात 6 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. याबरोबच एकूण ओमिक्रॉन बाधितांची संख्या 460 एवढी झाली आहे. देशात सर्वात जास्त ओमिक्रॉन बाधित महाराष्ट्रातच आहेत.

मुंबईत कोरोनाचा धक्कादायक वेग

सध्या मुंबईत 10 कंटेन्मेंट झोन असून 157 इमारती सील करण्यात आल्या आहेत. ज्या वेगाने केसेस वाढत आहेत, ते पाहता कंटेनमेंट झोनही वाढतील आणि अनेक इमारतीही बंद केल्या जाऊ शकतात. सध्या मुंबईत 22,334 सक्रिय रुग्ण आहेत. ही दिलासा देणारी बाब आहे की, बहुतांश रुग्णांमध्ये अद्याप गंभीर लक्षणे दिसत नाहीत, अशा परिस्थितीत रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण फारसे वाढलेले नाही.

काल मुंबईत कोरोनाचे 5631 रुग्ण आढळले होते, त्यामुळे आज पुन्हा एकदा बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी झेप घेतली आहे. कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉनदेखील मुंबईत वेगाने पसरत आहे. ओमिक्रॉनचा येथे सामुदायिक संसर्ग पसरल्याची शंका तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कारण अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात कोणताही प्रवास इतिहास दिसत नाही किंवा संपर्क ट्रेसिंग शक्य नाही.

दिल्लीतही कोरोना हाताबाहेर

मुंबईशिवाय राजधानी दिल्लीतही कोरोनाचा वेग धडकी भरवू लागला आहे. ज्या वेगाने प्रकरणे वाढत आहेत, त्यामुळे राजधानीत लवकरच आणखी कडक निर्बंध लागू केले जातील, असे बोलले जात आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनाचे 2716 नवीन रुग्ण आढळले आहेत. संसर्गाचे प्रमाणही ३.६ टक्क्यांवर पोहोचले आहे. तिसर्‍या लाटेचा परिणाम इतर अनेक राज्यांमध्येही दिसू लागला आहे. बंगाल असो की बिहार, केरळ असो की कर्नाटक, सर्वत्र केसेस वेगाने वाढत आहेत.

Corona in Maharashtra Record rate of corona infection in the state, 9170 new cases in 24 hours, 7 deaths recorded

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub