प्रतिनिधी
पुणे : Home Affairs Kadam स्वारगेट येथे बसमध्ये तरुणीवर बलात्काराच्या प्रकरणात गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी मुक्ताफळे उधळली आहेत. ते म्हणाले की, तरुणीने आरडाओरड, विरोध केलाच नाही म्हणून आरोपीला गुन्हा करता आला. दरम्यान, पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडेची माहिती देणाऱ्याला १ लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे, तर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्व नव्या एसटी बसमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची घोषणा केली.Home Affairs Kadam
कदम गुरुवारी स्वारगेट स्थानकाची पाहणी केली. ते म्हणाले की, या घटनेत कुठलाही स्ट्रगल (संघर्ष) किंवा फोर्सफुल कृती (आरडाओरड) झाली नाही. घटनेच्या वेळी बसच परिसरात १० ते १५ लोक होते. पण तरुणीने विरोध, आरडाओरड केलाच नाही. त्यामुळे आरोपीला गुन्हा करता आला. एसटी स्थानक आवारात खासगी सुरक्षा असते. त्यासाठी महामंडळाला पैसे दिले जातात. त्यामुळे आगारप्रमुखांनीच देखरेख ठेवली पाहिजे.
पाेलिसांच्या श्रेयवादाच्या लढाईत आराेपी पसार
स्वारगेट पाेलिस आणि गुन्हे शाखेच्या श्रेयवादाच्या लढाईत आरोपी पसार झाला. पोलिसांनी आराेपीच्या घरात शिरून त्याच्याशी साम्य असलेल्या भावास पकडले व चाैकशी सुरू केली. या गाेंधळातच गावातच असलेल्या आराेपीस कुणकुण लागली आणि ताे गावातील उसाच्या शेतात पसार झाला, अशी माहिती समोर आली आहे.
सर्व नव्या बसमध्ये सीसीटीव्ही बसवणार- परिवहनमंत्री
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेतले. सर्व नव्या बसमध्ये सीसीटीव्ही, जीपीएस लावणार. बसस्थानके, आगारांमध्ये सीसीटीव्हीची ‘एआय’ आधारित यंत्रणा उभारली जाणार आहे. बंद बस १५ एप्रिलपर्यंत एसटीच्या ताफ्यातून काढून टाकू. बसस्थानकावर महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी. मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी पदावर आयपीएस अधिकाऱ्याच्या नियुक्तीचा प्रस्ताव दिला जाणार आहे.’
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App