प्रतिनिधी
पुणे : एकीकडे फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाच्या अनुवादाला राज्य शासनाने दिलेल्या पुरस्कार मागे घेतल्याबद्दल पुरोगाम्यांनी आरडाओरड सुरू केली असताना सुरू केली असताना दुसरीकडे एका पुस्तकाच्या खासगी प्रकाशनालाच त्यांनी आक्षेप घेतला आहे. Controversy Over Book Publication Malegaon Accused Lt Col Prasad Shrikant Purohit Book
मालेगाव 2008 मधील बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावर लेखिका स्मिता मिश्रा यांनी “लेफ्टनंट कर्नल पुरोहित द मॅन बिट्रेड?” या पुस्तकाचे लिखाण केले आहे. 18 डिसेंबर रोजी या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात होईल परंतु, या पुस्तक प्रकाशनावरून पुरोगामी संघटनांनी एसपी कॉलेजला धमकीवजा इशारा दिला आहे.
भीमआर्मी बहुजन एकता मिशन अध्यक्ष दत्ता पोळ आणि मूलनिवासी मुस्लिम मंच अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी शुक्रवारी स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य यांना भेटून पुस्तक प्रकाशानाचा कार्यक्रम महाविद्यालयात घेऊ नये, असा इशारा दिला आहे.
प्राचार्यांना विनंती
अंजुम इनामदार म्हणाले, आम्ही प्राचार्यांना विनंती केली आहे की, एसपी कॉलेज आणि त्याच्या विद्यार्थ्यांच्या आणि सर्वसमावेशक जनतेच्या हितासाठी आमच्या विनंतीचा विचार त्यांनी करावा. “लेफ्टनंट कर्नल पुरोहित द मॅन बिट्रेड?” असे शीर्षक असलेल्या पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम 18 डिसेंबर 2022 रोजी पुणे येथे स. प. महाविद्यालयाच्या आवारात, म्हणजे लेडी रमाबाई हॉलमध्ये आयोजित केला आहे. तो घेऊ नये.
कर्नल पुरोहित हे मालेगाव 2008 मधील बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत. यात 6 लोक मरण पावले आणि शंभरहून अधिक जखमी झाले. त्यांच्यावर कायद्यांतर्गत गंभीर आरोप दाखल आहेत. पुस्तक प्रकाशनामुळे महाविद्यालयाची प्रतिष्ठा आणि त्याचे उज्ज्वल ट्रॅक रेकॉर्ड खराब होईल. हे प्रकरण मुंबईतील एनआयए न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे आणि एसपी कॉलेजमध्ये पुस्तक प्रकाशन करणे उचित नाही. ज्याचा शैक्षणिक उपक्रमांशी काहीही संबंध नाही अशा उपक्रमांसाठी कोणालाही महाविद्यालयाच्या परिसराचा वापर करू देऊ नका, असा इशारा त्यांनी दिला आहे.
18 डिसेंबरला पुस्तक प्रकाशन
या पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळ्याला 18 डिसेंबर रोजी दुपारी 4.00 पुण्याचे माजी पोलीस आयुक्त जयंत उमराणीकर, पुणे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय बर्वे हे उपस्थित राहणार आहेत. स्मिता मिश्रा यांनी या पुस्तकाचे लेखन केले असून रेणू वर्मा या पुस्तकाच्या प्रकाशक आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App