विशेष प्रतिनिधी
पुणे : Sangeet Sannyasta Khadga स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ या ऐतिहासिक नाटकाच्या पुण्यातील पहिल्याच प्रयोगात मोठा वाद निर्माण झाला आहे. पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित या प्रयोगादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आक्षेप घेत गोंधळ घातला.Sangeet Sannyasta Khadga
या नाटकात भगवान गौतम बुद्ध आणि अहिंसेच्या तत्त्वज्ञानाबाबत अवमानकारक आणि दिशाभूल करणारे विधान करण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. या नाटकातील संवाद जाणीवपूर्वक बौद्ध धर्माच्या मूल्यांवर हल्ला करणारे असून, भगवान बुद्ध यांचा अपमान करणारे आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया वंचितच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आली.
कार्यकर्त्यांनी सांगितले की, हे नाटक सावरकरांच्या कट्टर हिंदुत्ववादी विचारधारेचा प्रसार करणारे आहे. गौतम बुद्धांसारख्या जगभर आदरणीय असलेल्या व्यक्तिमत्वाविषयी अशा प्रकारची मांडणी खपवून घेतली जाणार नाही. नाटकाच्या संहितेवर आणि आयोजकांवर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
या नाटकाच्या संकल्पनेतून सात्यकी सावरकर यांनी त्याची पुनर्रचना केली असून, नाटकाच्या प्रयोगावेळी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचीही उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीमुळे वातावरण अधिकच तापले आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अशा अपमानास्पद प्रसंगाच्या वेळी भाजप खासदार गप्प का राहतात?” असा सवाल उपस्थित करत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. मात्र, मेधा कुलकर्णी यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत गोंधळावर नियंत्रण मिळवले, मात्र प्रेक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. नाटक थांबवण्यात आले नसले तरी आयोजकांवर आणि नाटकाच्या आशयावर टीकेची झोड उठली आहे.
दरम्यान, या वादामुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे लेखन, त्यांचे ऐतिहासिक दृष्टिकोन आणि त्यांच्यावर होणारी टीका-पक्षपाती स्तुती यावर पुन्हा एकदा विचारमंथन सुरू झाले आहे.
सोशल मीडियावरही #BuddhaVirodh आणि #SavarkarPlay वरील ट्रेंड्स वाढत असून, काहींनी नाटकाच्या बंदीची मागणी केली आहे, तर दुसऱ्या बाजूने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करत याला राजकीय ड्रामा ठरवले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App