वृत्तसंस्था
पुणे : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. कारण नोकरीला लागण्यासाठी देण्यात आलेली कागदपत्रे आणि आतापर्यंतच्या नोकरीतील वर्तनासंदर्भात चौकशी करण्यासाठी आता केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने अतिरिक्त सचिव दर्जाच्या एका अधिकाऱ्याची समिती स्थापन केली आहे. ही एक सदस्यीय समिती पूजा खेडकरांची चौकशी करणार आहे. पुढील 2 आठवड्यामध्ये या समितीला अहवाल सादर करण्याचे निर्देश केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आले आहे.Controversial IAS Pooja Khedkar’s Troubles Rise; falsified disability certificate and investigation of employment record; Committee constituted by the Centre
काय आहे नेमकं प्रकरण?
पूजा खेडकर या 2022 सालच्या परीक्षेतून आयएएस अधिकारी झाल्या आहेत. त्यानी 2019 सालची परीक्षा ही सर्वसामान्य प्रवर्गातून दिली होती. त्यानंतर 2022 सालची परीक्षा ही व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे दृष्टीदोषाचे सर्टिफिकेट जमा करून अपंगांच्या प्रवर्गातून दिल्याचं समोर आले. पूजा खेडकरांनी या परीक्षेसाठी ओबीसी सर्टिफिकेटही काढल्याचे समोर आलेले आहे. त्यांचे वडील दिलीप खेडकर हे निवृत्त आयएएस अधिकारी असून त्यांनी अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी खेडकरांनी त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 49 लाख रुपये इतकं दाखवलं होतं. त्यामुळे पूजा खेडकरांना नॉन क्रिमी लेअरमधून सर्टिफिकेट कसे मिळाले, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला होता.
UPSC व CATचा विरोध तरीही नियुक्ती?
पूजा खेडकरांनी बनावट अपंगत्वाचा दाखला काढला आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर यूपीएससीने तब्बल सहा वेळा वैद्यकीय चाचणीसाठी बोलावल्यानंतरही गैरहजर राहिल्या. नंतर कुठल्यातरी खासगी रुग्णालयातून एमआरआय अहवाल सादर केला. त्यामुळे खेडकरांच्या नियुक्तीला यूपीएससी आणि कॅट दोघांनीही विरोध केला. तरीही त्यांना नियुक्ती कशी मिळाली याचा तपास आता केंद्र सरकारची समिती करणार आहे.
पूजा खेजकर वाशिमध्ये रूजू
वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली आहे. परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पूजा खेडकर या वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्या. मात्र, ज्या अंबर दिव्यावरुन त्या वादात सापडल्या त्याची हौस काय संपलेली दिसत नाही. गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू होताना पूजा खेडकर अंबर दिवा असलेल्या सरकारी गाडीने कार्यालयात दाखल झाल्या. दरम्यान पुण्यात ऑडी कारवरील कारवाईबाबत पूजा खेडकर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास माध्यमांना टाळाटाळ केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App