वृत्तसंस्था
मुंबई : “दोन दिवसांपूर्वी शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची बैठक झाली. या बैठकीत पोलिसांच्या बळाचा वापर करून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरडून काढायचे षडयंत्र राचल्याचा घणाघाती आरोप रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे. Conspiracy to crush ST workers’ agitation by police force; Sadabhau Khot’s attack on Sharad Pawar-Anil Parab
एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांसह मंत्रालयावर मोर्चा काढण्यासाठी मुंबईत आले होते. मात्र, मोर्चेकऱ्यांमुळे वाहतूक कोंडी झाल्याने त्यांना वाशी चेकनाक्याजवळ रोखले आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ४० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून देखील सरकार बोलायला तयार नाही. त्यामुळे जोपर्यंत मला मुंबईत जाऊ देणार नाही, तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन करणार आहे,” सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
“हे आंदोलन चिघळवण्याचं काम राज्य सरकारनं केले आहे. मंत्रालयालयाऐवजी आझाद मैदानात येण्याचे आवाहन प्रशासनाने केलं होतं. त्यांच्या आवाहनाला आम्ही संमती दिली होती. पंरतु त्यापूर्वीच अडवण्यात आले. राज्यभरातून ५० हजार एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, सर्वांनाच कुठेना कुठे बॅरिकेड्स लावून अडवत आहेत. ही लढाई एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्काची लढाई आहे. आपण त्यांना त्यांचा हक्क मागण्यापासून थांबवू शकत नाही,” असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App