विशेष प्रतिनिधी
मुंबई : नववर्षाच्या पूर्वसंध्येला खलिस्तानी संघटना मुंबईत घातपाताचा मोठा कट आखत असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या हाती लागली आहे. त्यामुळे मुंबईत आता कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.Conspiracy of Khalistani organizations in Mumbai, information of Central Intelligence Agency
विशेष म्हणजे त्यासाठी मुंबई पोलिसांच्या 31 डिसेंबरला असणाºया साप्ताहिक आणि इतर सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.मुंबईत गर्दीच्या ठिकाणी घातपाताची घटना घडू शकते, असा इशारा गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत.
3सगळ्या प्रकारची काळजी घेतली जात आहे. काही अनपेक्षित घटना घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांना तैनात करण्यात आलं आहे. सुरक्षा खात्याच्या प्रत्येक विभागाला अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. यामध्ये प्रत्येक पोलीस ठाणे, पोलीस चौकी पासून ते क्राईम ब्रांच या सगळ्यांचा समावेश आहे.
मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या गेल्या आठ दिवसांपासून वाढत आहे. गेल्या तीन दिवसांपासून तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहे. त्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे पोलीसांवर बंदोबस्ताची जबाबदारी आहे. त्यातच दहशतवादी हल्याचा इशारा आल्यामुळे आता अतिरिक्त ताण येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App